*
सोनपेठ/प्रतिनिधी
सोनपेठ शहरातील सर्व समूहाला आणि समाजाला विकासरुपी प्रवाहात आणण्यासाठी माजी नगराध्यक्ष चंद्रकांत राठोड यांच्या पाठीशी असल्याचे मत जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष तथा राष्ट्रवादीचे नेते राजेश विटेकर यांनी शहरातील प्रभाग क्रमांक ८ मधील इनामदार वसाहतीमधील मुस्लिम समाजाच्या स्मशानभूमी संरक्षक भिंतीच्या बांधकामाच्या उद्घाटनप्रसंगी बोलताना व्यक्त केले.यावेळी त्यांनी नगराध्यक्ष राठोड यांनी शहराचा सर्वांगीन विकास करण्यासाठी केलेले प्रयत्न अत्यंत मेहनतीचे असून सर्व समाजातील शेवटच्या घटकाला विकासरुपी प्रवाहात आणण्यासाठी राठोड हे योग्य भूमिका घेत असल्यानेच भविष्यात राठोड यांच्या सोबत राहणार असल्याचे सूतोवाच केले.यावेळी त्यांनी राठोड यांनी मुस्लीम समाजाच्या मागील अनेक दिवसांपासून असणाऱ्या मागणीचा पाठपुरावा आपल्याकडे केला आणि ही मागणी महाराष्ट्र राज्याचे अल्पसंख्यांक विभागाचे मंत्री तथा परभणी जिल्ह्याचे पालकमंत्री नवाब मलीक व आ.बाबाजानी दुर्राणी यांच्याकडे केली असता त्यांनी कब्रस्तानच्या सुरक्षा भिंतीसाठी सोनपेठ नगर परिषदेस २३ लक्ष रुपयाचा निधी मंजुर केला आहे.याबद्दल विटेकर यांनी दोन्हीही नेत्याचे आभार मानले.या कार्यक्रमाचे उदघाटन राजेश विटेकर यांच्या हस्ते इनामदार वसाहत येथे पार पडले.यावेळी माजी नगराध्यक्ष तथा गटनेते चंद्रकांत राठोड,गटनेते अँड.श्रीकांत विटेकर,युवा नगरसेवक निलेश राठोड,रमाकांत राठोड,राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष दशरथ सूर्यवंशी,उपनगराध्यक्ष दत्तराव कदम,विनोद चिमनगुंडे,डिंगाबर भाडुळे,माजी उपनगराध्यक्ष तथा नगरसेवक उस्मान कुरेशी,नगरसेवक अब्दुल रहेमान सौदागर,नगरसेवक अमृत स्वामी,यांच्यासह नगरसेवकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.यावेळी या कामासाठी नगरसेवक निलेश राठोड,नजीर राज यांचा सत्कार करण्यात आला.

COMMENTS