दिंद्रुड ची ऋतुजा रामेश्वर मुंडे ॲबॅकस परीक्षेत देशात पाचवी ज्ञानदीप कोचिंग क्लासेसच्या वतीने सत्कार संपन्न


दिंद्रुड प्रतिनिधी

नुकत्याच संपन्न झालेल्या राष्ट्रस्तरीय अॅबॅकस ऑनलाईन स्पर्धा 2021 परीक्षेत दिंद्रुड येथील ज्ञानदीप अॅबॅकस अकॅडमी ची विद्यार्थिनी कु. ऋतुजा रामेश्वर मुंडे हिने देशात पाचवा क्रमांक मिळवत दैदिप्यमान यश मिळवत नाव लौकिक केले आहे. ज्ञानदीप अॅबकस अकॅडमी च्या वतीने ऋतुजा मुंडे च्या सन्मान सोहळ्याचे आयोजन काल शुक्रवारी करण्यात आले होते. या सोहळ्यास अॅबकस मराठवाडा विभाग प्रमुख विजयकुमार कुसुमकर, विश्वनाथ रणशुर, विकास निकाळजे,संतोष बदने,डाॅ.विष्णु तिडके,चंद्रकांत गायकवाड,गणेश कांबळे, सिध्देश्वर बोकन,मारुती दुनगु यांच्यासह दिंद्रुड परिसरातील प्रतिष्ठीत मान्यवरांची उपस्थिती होती. 

या परिक्षेत ज्ञानदीप अबॅकस अकॅडमी चे विद्यार्थी शिवम फपाळ १६ वी रँक, सत्यम फपाळ २० वी रँक, संस्कृती सिरसाट २२ वी रँक अनुराधा ठोंबरे २४ वी रँक घेत अॅबकस मध्ये उत्तीर्ण झाले असुन अकॅडमी च्या वतीने प्रा. बाबुराव गिते यांनी अभिनंदन केले आहे.

टिप्पण्या