जिल्हा प्रतिनिधी महेंद्र पुरी, हिंगोली
हिंगोली शहरात विविध गुन्हे दाखल असलेल्या ६ आरोपीं विरूध्द मोका अंतर्गत कारवाई करण्यात आली असून या ६ आरोपींना जिल्हा सत्र न्यायालयाने शहर पोलिस ठाण्यात १५ फेब्रूवारी पर्यंत हजर होण्याचे आदेश दिले होते. मात्र सदर आरोपींनी जिल्हयातुन पलायन केले आहे. त्यापैकी एक आरोपी हा हिंगोली शहरात येणार असल्याची गुप्त माहिती शहर पोलिसांना मिळाल्या नंतर 20 फेबु्रवारी रोजी शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक पंडीत कच्छवे यांच्या पथकाने मोठया शिताफीने सदर आरोपीला ताब्यात घेतले आहे. हिंगोली शहरातील गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलिस अधिक्षक राकेश कलासागर यांनी विविध गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असलेल्या व संघठीत गुन्हेगारी करनार्या शहरातील ६ आरोपी विरूध्द मोका अंतर्गत कारवाई केली असून या आरोपींना हिंगोली जिल्हा सत्र न्यायालयाने शहर पोलिस ठाण्यात १५ फेब्रूवारी पर्यंत हजर होण्याचे आदेश दिले होते. मात्र सदर आरोपींनी १४ फेब्रूवारी रोजी जिल्हयाबाहेर पलायन केले आहे. ज्यांच्या शोधासाठी शहर पोलिस ठाण्याचे पथक बाहेर जिल्हयात रवाना झाले आहे. या सहा आरोपी पैकी एक आरोपी कैलास सुभाष मनबोलकर हे २० फेब्रूवारी रोजी हिंगोली शहरात येणार असल्याची गुप्त माहिती शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक पंडीत कच्छवे यांना मिळाल्यानंतर सहाय्यक पोलिस अधिक्षक IPS यतीश देशमुख यांच्या मार्गदर्शना खाली हिंगोली शहर पोलिस ठाण्याचे कर्तबगार पोलिस निरीक्षक पंडीत कच्छवे, उपनिरीक्षक केनेकर, उमेश जाधव, होळकर, अस्लम शेख, चालक अंभोरे यांच्या पथकाने मोठया शिताफीने खटकाळी बायपास परिसरात सापळा रचुन आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत. सदर आरोपीला हिंगोली न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने १३ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. मोकातील उर्वरीत आरोपींचा शोध सुरू असून लवकरच उर्वरीत आरोपींना अटक केली जाईल अशी माहिती शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक पंडीत कच्छवे यांनी ग्लोबल मराठवाडाशी बोलतांना दिली आहे.
addComments
टिप्पणी पोस्ट करा