केज / रमेश इतापे
केज तालुक्यातील डोका (हादगाव) या ठिकाणची बससेवा पूर्ववत सुरू करण्याची मागणी हादगाव चे सरपंच सुनील आबा वायबसे यांनी केली आहे.
याविषयी सविस्तर वृत्त असे की कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर सगळीकडे लॉकडाऊन करण्यात आले होते. यामुळे दळणवळण संपूर्णतः बंद करण्यात आले होते. परंतु कोरोना विषाणूचा प्रभाव जसा जसा कमी होत आहे. तशी तशी सगळीकडे सर्व व्यवहार सुरळीत करण्याच्या दिशेने वाटचाल सुरू असून याचाच एक भाग म्हणून ग्रामीण भागातील बस सेवा सुद्धा काही प्रमाणात सुरळीत चालू झाली आहे. ग्रामीण भागातील नागरिकांना, विद्यार्थ्यांना दवाखाना, तहसील, व शिक्षणासाठी ईतर बाजार हाट करण्यासाठी सारखे शहरात जावे लागते. परंतु तालुक्यातील डोका (हादगाव) या ठिकाणी पूर्वी केज ते डोका ही धारूर आगाराची बस व कळंब ते डोका ही कळंब आगाराची बस सुरू होती. परंतु नंतर सगळीकडच्या बस सेवा सुरू झाल्या असून या दोन्ही बस अद्यापपर्यंत चालू झाल्या नाहीत. यामुळे डोका, हादगाव, मांगवडगाव, सारुकवाडी, सातेफळ, चिंचोली माळी या गावातील प्रवाशांचे व विद्यार्थ्यांचे अतोनात हाल होत आहेत. तरी यापूर्वीही हदगाव चे सरपंच सुनील आबा वायबसे यांनी दोन-तीन वेळा निवेदनाद्वारे बस सेवा सुरू करण्याची मागणी देखील केलेली आहे. परंतु बस अद्याप चालू झाली नाही. जर लवकरात लवकर या दोन्हीही बस सेवा सुरु नाही झाल्या तर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा हादगाव चे सरपंच सुनील आबा वायबसे यांनी दिला आहे.

COMMENTS