जिल्हा प्रतिनिधी- महेंद्र पुरी, हिंगोली
पोलिस म्हंटले की अनेकांच्या मनात चांगले वाईट विचार येत असतात मात्र खाकीवर्दीत ही एक माणुस असल्याचे आपण कदाचीत विसरून जातो अशाच एका खाकीवर्दीतील माणसाने कोरोना महामारीच्या काळात रात्रंदिवस नागरीकांची सेवा केली. गरजुंना अन्नदान असो की कडक लाँकडाऊन च्या काळात वयोवृद्ध गरजुंना दवाखान्यात पोहचवणे असो असे उत्कृष्ट काम केल्याबद्दल शिवजयंती मोहोत्सव समितीच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त त्यांचा कोरोना योध्दा पुरस्कार देऊन सन्मान केला. शेख शकिल शेख रतन हे 2001 मध्ये हिंगोली पोलिस दलात भरती झाले. त्यांनी अत्तापर्य जिल्ह्यातील विविध ठाण्यात कर्तव्य बजावले. पोलिस दलातील 20 वर्षा च्या सेवेत त्यांनी चोरी, घरफोडी, जबरी चोरी चे गुन्हे उघडकीस आणले, विविध गुन्ह्याचा तपास उत्कृष्ट रित्या केल्याने 175 रिवार्ड मिळाले आहेत. तर विविध पोलिस अधिक्षक यांच्या हस्ते त्यांच्या कार्याचा गौरव हि झाला. सध्या शेख शकिल हे हिंगोली शहर पोलिस ठाण्यात कार्यरत आहेत. शेख शकिल शेख रतन यांनी कोरोना काळात पोलिस ड्युटि करित असताना गरजुंना अन्नदान व्यवस्था करुन देणे, पेशन्ट ला दवाखान्यामध्ये भरती करणे, रात्रंदिवस रस्त्यावर उतरून कार्य केले व कोरोना चा प्रसार थांबविण्यासाठी रस्त्यावर फिरणार्या नागरीकांची जनजागृती करून घराबाहेर न पडण्याचे आवाहन केले, कन्टेनमेन्ट भागात पेट्रोलिंग, बंदोबस्त नियोजन केले व पोलिस दलाचे नाव उंचावेल असे उल्लेखनिय कार्य केले, त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना छत्रपति शिवाजी महाराज सार्वजनिक जयंती उत्सव समितिकडुन सन्मान चिन्ह व प्रमाणपत्र देऊन कोरोना योद्धा म्हणुन गौरवण्यात आले आहे.
अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्ताने माझा गौरव होने माझ्या जिवनातील एक महत्वपुर्ण दिवस आहे. यापुढे ही पोलिस दलात सेवा बजावतांना गोरगरीबांना न्याय देण्यासाठी मला मोठे पाठबळ या सत्काररूपी अशिर्वादाने मिळाले आहे असे शेख शकील यांनी ग्लोबल मराठवाडा न्युज शी बोलतांना सांगितले आहे. शेख शकील यांच्या सामाजिक कार्यास ग्लोबल मराठवाडा न्युज चा सलाम

COMMENTS