सेलू ( )नूतन विद्यालयात श्री संत गाडगेबाबा यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले.या अभिवादन सोहळ्याला मुख्याध्यापक अशोककुमार...
सेलू ( )नूतन विद्यालयात श्री संत गाडगेबाबा यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले.या अभिवादन सोहळ्याला मुख्याध्यापक अशोककुमार वानरे, उपमुख्याध्यापक रामकिशन मखमले,पर्यवेक्षक रघुनाथ सोनेंकर,नारायण सोळंके, वरीष्ठ लिपिक नंदकुमार बंगाळे, सौ.मयुरी जैस्वाल, सौ. सुनिता सांगुळे, उपस्थित होते.मुख्याध्यापक श्री वानरे सर यांनी संत गाडगेबाबा यांच्या स्वच्छता आणि शिक्षण या क्षेत्रातील कार्याची महती सांगून सध्याच्या कोविड -19 च्या पार्श्वभूमीवर स्वच्छतेचे महत्व अधोरेखित केले.
कार्यक्रमाचे संचलन व आभार प्रदर्शन सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ काशिनाथ पल्लेवाड यांनी केले.

COMMENTS