अन्न व भेसळ प्रशासनाचे अधिकारी नुसते नावालाच* *सोनपेठमध्ये लाखो लोकांचे जीव धोक्यात!मंत्री राजेंद्र शिंगणे लक्ष घालतील का?*

सोनपेठ/प्रतिनिधी जिल्ह्याच्या शेवटच्या टोकाला असणारा सोनपेठ तालुका विकासासोबतच इतरही बाबतीत मागे असल्याचे चित्र दिसून येत आहे.यात अन्न व भेस...


सोनपेठ/प्रतिनिधी

जिल्ह्याच्या शेवटच्या टोकाला असणारा सोनपेठ तालुका विकासासोबतच इतरही बाबतीत मागे असल्याचे चित्र दिसून येत आहे.यात अन्न व भेसळ प्रशासनाच्या अधिकाऱ्यांसाठी हा तालुका म्हणजे सोन्याची खान असल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे.तालुक्यात बाजार खरेदी करण्यासाठी ग्रामीण भागातून येणाऱ्यांची संख्या लक्षणीय असल्याने खाजगी पाणी फिल्टरचालक व हॉटेल चालकांनी ग्रामीण भागातुन येणाऱ्या लोकांच्या जीविताशी खेळण्याचा विडा उचलला आहे का?असा सवालही सध्या उपस्थित होत आहे.अन्न व भेसळ प्रशासनाच्या या अधिकाऱ्यांवर कार्यवाही करण्याची मागणीने जोर धरला असून दर सोमवारी सोनपेठ तालुक्याचा बाजारपेठ भरला जातो या बाजारपेठेसाठी तालुक्यातील ग्रामीण भागातून भरपूर लोक येत असतात यामुळे शहरातील हॉटेल चालकांसोबतच पाणी फिल्टरवाले यांचीही चांदी होत असल्याने या संधीचा फायदा घेऊन अन्न व भेसळ प्रशासनाचे अधिकारीही सोनपेठमध्ये येतात खरे!मात्र पाथरी रोडवरील एकांत ठिकाणी येणाऱ्या व्यक्तीची वाट पाहतात ना कार्यवाही!ना चौकशी!ना शहरात पाऊल!असा प्रकार परभणी येथून कार्यवाहीच्या नावाखाली येणाऱ्या अधिकाऱ्यांकडून होत असल्याने शहरात आर्थिक देवाण-घेवाण होत असल्याची चर्चा होत असून तडजोडीसाठी पाथरी रोडवरील एकांत ठिकाणी ही गाडी येऊन थांबते.आणि शहरातील किराणा दुकानदारांचा म्होरक्या या अधिकार्‍याशी लगट साधतो.यामुळे शहरातील खाजगी आर.ओ.प्लँटचालक,स्वीटमार्टचालक,हॉटेलचालक,किराणा दुकानदार यांना भय नसल्याने निर्भय होऊन लोकांच्या जीविताशी खेळ खेळत असल्याचा प्रकार चर्चेतून होत आहे.यात थंड पाण्याच्या व फिल्टरयुक्त पाण्याच्या नावाखाली असणारा गोरखधंदा,मिठाईच्या नावाखाली असणाऱ्या हॉटेलचालकासह,स्वीटमार्टचालकांचा माव्याचा व्यवसाय चालू असल्याचे चित्रही दिसून येतेय त्यासोबतच शासनाने काढलेल्या नव्या परिपत्रकास हे हॉटेलचालक,स्वीटमार्टचालक कचऱ्याची वाट दाखवत असल्यानेच मिठाईस कालबाह्यता तारीख असलेल्या चिट्या चिटकवलेल्या नसल्या स्पष्ट दिसून येत आहे.यासोबतच शहरातील हॉटेलमध्ये स्वच्छतेचा अभाव असल्याचेही कळते.किराणा दुकानावर यांच्याकडून सर्रास गुटखा,तंबाकू,आर.एम.डी.,मावा यांची खुलेआम विक्री केली जात आहे.तालुक्यात येणार्‍या अन्न व भेसळ अधिकाऱ्यांसाठी हा तालुका म्हणजे सोन्याची खाण असल्याचा समज झाल्यानेच तालुक्यात निर्ढावलेले व्यवसाय बळावले आहेत यामुळे कार्यवाही करण्याची मागणी जोर धरत आहे.

*मंत्री महोदयांच्या कानावर सदर प्रकार घातला असून कार्यवाही करण्यात येईल:-सचिव*

हा सर्व प्रकार अत्यंत खेदजनक असल्याने या सर्व प्रकारावर गांभीर्याने कार्यवाही करणार असल्याचे अन्न व भेसळ या खात्याचे मंत्री राजेंद्र शिंगणे यांचे सचिव यांनी सांगितले यात परभणी येथील सहाय्यक आयुक्त यांच्याकडे तो अधिकारी कोण?याबाबत कार्यवाहीसाठी प्रस्ताव पाठवण्याचे कळवण्यात आल्याची माहीतीही सचिव कार्यालयाकडून देण्यात आली आहे.

COMMENTS

[विशेष न्युज]$hide=post

Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Read more Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content
×
व्हॉट्सअपवर अपडेट्स मिळवण्यासाठी येथे क्लिक करा Join Group