आष्टी (दादासाहेब बन)
हिंदु जगण्याची समृध्द अडगळ ही कांदबरी भालचंद्र नेमाडे यांनी लिहलेली आहे.त्याचे प्रकाशन भटकळ पॉप्युलर प्रकाशन मुंबई यांनी केलेले आहे.या कांदबरीमध्ये बंजारा समाजातील महिलाबद्दल अत्यंत अश्लील व बिभत्स स्वरूपाचे तांडयाचे वर्णन करून समाजातील महिलांच्या भावना दुखावलेल्या आहेत.त्यामुळे या
कांदबरीला सन २०१४ सालच्या साहित्याच्या क्षेत्रातील अत्यंत प्रतिष्ठेचा समजला जाणाऱ्या ज्ञानपीठ पुरस्कार २०१५ साली मिळालेला पुरस्कार परत घेणेसाठी राज्य सरकारने भारतसरकार ज्ञानपीठ पुरस्कार समिती यांना शिफारस करून परत घेण्यात यावा याबाबत शिफारस करावी बंजारा समाजातील महिलांबदल आक्षेपार्ह लिखान केल्याबदल लेखक भालचंद्र नेमाडे व प्रकाशकांवर फौजदारी स्वरूपाची कार्यवाही करावी नसता आम्ही बंजारा समाजबांधव तर्फे येत्याकाळात मोठया स्वरूपात आंदोलन करण्यात येईल असा इशारा बंजारा समाज व राष्ट्रीय बंजारा परिषद आष्टी तालुका यांनी दिले आहे.या निवेदनावर राष्ट्रीय बंजारा समाज परिषदेचे तालुकाध्यक्ष समीर जाठोत,गोर समाज संघटनेचे तालुकाध्यक्ष अरविंद चव्हाण,अंकुश पवार,सुनिल राठोड,निलेश राठोड ,सचिन चव्हाण ,अंकुश पवार,अंकुश जाधव ,अरविंद राठोड ,विशाल राठोड ,अनुप पवार, प्रकाश राठोड ,बबलु राठोड यांच्या निवेदनावर सह्या आहेत.

COMMENTS