शिव संघर्ष ग्रुप शिवजयंती घराघरात साजरी करणार....सुरेश पाटोळे.


बीड (प्रतिनिधी)

    कुळवाडी भूषण, बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज यांची १९ फेब्रुवारी रोजी होणारी शिवजयंती शिव संघर्ष ग्रुप सध्या कोरोनाच्या काळात कोणत्याही पारंपरिक वाद्य, पोवाडे, व्याख्याने आणि मिरवणुकांशिवाय सामाजिक बांधीलकी जपत घराघरात पारंपरिक सणाप्रमाणे साजरी करणार आहे. अशी माहिती शिव संघर्ष ग्रुप चे मावळे तथा सामाजिक कार्यकर्ते सुरेश पाटोळे यांनी सांगितले आहे. 

दरवर्षी चौकाचौकांत मंडप उभारून साजरी होणारी शिवजयंती यंदा मात्र कोरोना महामारी मुळे सामाजिक बांधिलकी जपत महाविकास आघाडी सरकार तर्फे घालून दिलेल्या नियमाचे पालन करत शिव संघर्ष ग्रुप घराघरांत शिवजन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करणार आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा शिव संघर्ष ग्रुप घराघरांत शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करावी. असे आवाहन करून कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊन आणि सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याचा संदेश शिव संघर्ष ग्रुप ने दिला आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करतांना १९ फेब्रुवारी सकाळी दहा वाजून दहा मिनिटांनी घरोघरी शिवजन्मोत्सव सोहळा साजरा करा. दरवर्षी सार्वजनिक शिवजयंतीनिमित्त आयोजित व्याख्याने, विविध स्पर्धा, मिरवणुका यंदा कोरोना महामारीमुळे आणि महाराष्ट्रातील पेसेंटची संख्या वाढत असल्याने प्रशासनाच्या सूचनेचे पालन करून सोशल डिस्टन्सिंग ठेवावे लागणार आहे.

अत्यंत महत्त्वाचे काम असेल तरच घरातून बाहेर पडावे, घरीच रहा सुरक्षित रहा असा संदेश शिव संघर्ष ग्रुप च्या सर्व मावळ्यांना शिवजयंती निमित्त सामाजिक कार्यकर्ते सुरेश पाटोळे यांनी दिला आहे.

टिप्पण्या
Popular posts
श्री.जगदंबा माध्य. व उच्च माध्यमिक विद्यालयाचे २० वर्षानंतर एकत्र आलेले दहावीचे माजी विद्यार्थी.
इमेज
हिरकणी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था माहूर येथे राष्ट्रीय एकता दिवस साजरा.
इमेज
सेलू येथे शालेय विभागीय कबड्डी क्रीडा स्पर्धा थाटात संपन्न* *गांधी विद्यालय परभणी मनपा विजयी*
इमेज
विकसित महाराष्ट्र 2047 अंतर्गत युवा आणि क्रीडा संवाद कार्यक्रमासाठी परभणी जिल्ह्याचे आढावा बैठक संपन्न
इमेज
माहूर शहर व तालुक्यात बंदी घातलेल्या गुटख्याची सर्रास विक्री; संबधीतांचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष ?
इमेज