*धारूर तालुक्यातील महा-ई-सेवा केंद्र मंजूर असलेल्या ठिकाणी चालवावे:-कृष्णा उकंडे*

धारूर/जगदीश गोरे

      धारूर तालुक्यातील महा-ई- सेवा केंद्र व बँकांचे ग्राहक सेवा केंद्र शासनाने मंजूर करून दिलेल्या ठिकाणीच चालवावे असे निवेदन शिवसंग्रामचे धारूर तालुकाध्यक्ष कृष्णा उकांडे यांनी आज तहसीलदार यांना निवेदन दिले

         किल्ले धारूर तालुक्यात महा ई सेवा केंद्र व बँकेचे ग्राहक सेवा केंद्र हे मंजूर असलेल्या ठिकाणी ठेवावे ग्राहक सेवा केंद्राचे मालक स्वतःच्या सोयीने शहरांमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी चालविताना दिसून येत आहेत व गोरगरीब लोकांची व शेतकऱ्यांची आर्थिक लूट मोठ्या प्रमाणात करत आहेत एसबीआय बँकेचे ग्राहक सेवा केंद्र धारूर शहर साठी कमी प्रमाणात मंजूर आहेत परंतु धारूर शहरांमध्ये सद्यस्थितीत 15 ते 20 ग्राहक सेवा केंद्र सुरू आहेत बँकेच्या नियमाप्रमाणे सदरील ग्राहक सेवा केंद्र हे मंजूर असलेल्या ठिकाणी असणे बंधनकारक आहे तरी जिल्हाधिकारी साहेबांनी याप्रकरणी तात्काळ लक्ष घालून धारूर शहरात सुरू असलेले अनाधिकृत माही सेवा केंद्र व बँकेचे ग्राहक सेवा केंद्र हे मंजूर असलेल्या ठिकाणी चालून ज्या त्या गावातील नागरिकांची सोय करावी व सामान्य नागरिकांची होणारी आर्थिक लूट थांबवावी अन्यथा शिवसंग्राम किल्ले धारूरच्या वतीने तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल असे निवेदन किल्ले धारुर शिवसंग्रामच्या वतीने देण्यात आले.

टिप्पण्या