‘इंडिया स्कूल मेरीट ॲवार्ड - 2020’ पुरस्काराने एसबी पाटील पब्लिक स्कूलचा गौरव एसबी पाटील पब्लिक स्कूलने पटकाविला राष्ट्रीय पुरस्कार


पिंपरी (दि. 7 फेब्रुवारी 2021) आगामी काळात पारंपरिक शिक्षण पध्दतीत आमुलाग्र बदल होऊन आधुनिक तंत्रज्ञानावर आधारीत, प्रयोगशील आणि विद्यार्थ्यांच्या कौशल्यगुणात वेगाने वाढ करणारी शिक्षण पध्दती विकसित होईल. बहुतांशी शाळांना त्याची अंमलबजावणी करावी लागेल. त्यासाठी लागणा-या पायाभूत सुविधा, त्याची आर्थिक तरतूद, विविधस्तरांवर आंतरशालेय उपक्रम, अध्यापनातील नाविन्यता, क्रिडा सुविधा, विद्यार्थ्यांची सुरक्षा, स्वच्छता याकडे शालेय संस्थांना लक्ष द्यावे लागेल. हे सर्व करीत असताना विद्यार्थ्यांचा शालेय, शारीरीक, मानसिक, समाजिक, सांस्कृतिक विकास करणे हि देखील शालेय संस्थांची प्रामुख्याने जबाबदारी राहील. या बाबींचे नियोजन करताना विद्यार्थी केंद्रबिंदू मानून काम केले तरच भारतातील भावी पिढीची प्रभावीपणे महासत्तेकडे वाटचाल होईल असे प्रतिपादन एज्युकेशन टुडे या संस्थेचे राष्ट्रीय संचालक अनिल शर्मा यांनी केले.

     पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या (पीसीईटी) रावेत येथिल एसबी पाटील पब्लिक स्कूलचा शैक्षणिक क्षेत्रात राष्ट्रीय पातळीवर काम करणा-या ‘एज्युकेशन टुडे’ या संस्थेने ‘इंडिया स्कूल मेरीट ॲवार्ड - 2020’ (India's school Merit Awards -2020) हा पुरस्कार देऊन गौरव केला. बेंगळूरु येथे 23 जानेवारी रोजी झालेल्या कार्यक्रमात एसबी पाटील पब्लिक स्कूलच्या मुख्याध्यापिका डॉ. बिंदू सैनी, पर्यवेक्षिका पद्मावती बंडा यांनी पुरस्कार स्विकारला. यावेळी देशभरातून आलेल्या विविध सीबीएसई स्कूलचे प्रतिनिधी, एज्युकेशन टुडे चे संचालक मनिष नायडू आदी उपस्थित होते.

      एज्युकेशन टुडे या संस्थेने देशभरातील पाचशेहून जास्त सीबीएसई स्कूलचे सर्वेक्षण केले. यामध्ये ‘विद्यार्थ्यांचा सर्वांगिण विकास साधणारी शाळा’ या प्रवर्गात एसबी पाटील स्कूलला प्रथम पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. एसबी पाटील पब्लिक स्कूलने विद्यार्थ्यांना केलेले मार्गदर्शन, राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर आयोजित केलेले विविध अभ्यासेतर उपक्रम, पायाभूत सुविधा ऑनलाईन शाळा कार्यप्रणाली, संसाधानांचा उपयोग, विद्यार्थी व कर्मचा-यांची आरोग्य व सुरक्षितता, उच्चशिक्षित शिक्षक वर्ग या बाबींचा विचार सर्वेक्षणात करण्यात आला.

   पीसीईटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्षा पद्माताई भोसले, खजिनदार शांताराम गराडे, सचिव विठ्ठल काळभोर, विश्वस्त हर्षवर्धन पाटील, कार्यकारी संचालक डॉ. गिरीष देसाई यांनी मुख्याध्यापिका, पर्यवेक्षक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचा-यांचे हा पुरस्कार मिळाल्याबद्दल अभिनंदन केले.

-------------------------

टिप्पण्या