राम दातीर माहूर ( प्रतिनिधी ) कोरोनाच्या दुस-या लाटेत दिवसेंदिवस रुग्णांच्या संख्येत प्रचंड वाढ होत असल्याची बाब लक्षात घेवून खबरदारी...
राम दातीर
माहूर ( प्रतिनिधी ) कोरोनाच्या दुस-या लाटेत दिवसेंदिवस रुग्णांच्या संख्येत प्रचंड वाढ होत असल्याची बाब लक्षात घेवून खबरदारीचा उपाय म्हणून शासनाने विविध प्रकारच्या धार्मिक कार्यक्रमावर निर्बंध घातल्याच्या पार्श्वभूमीवर श्रीदत्त शिखर संस्थानच्या विश्वस्त समितीने दत्त मंदिरासह अनुसया मातेचे मंदिर सोमवार दि. 23 फेब्रु.पासून भाविकांसाठी बंद केल्याचे प्रसिद्धीसाठी दिलेल्या पत्रातून कळविले आहे.
देशाच्या कानाकोप-यातून येणाऱ्या दर्शनार्थी भाविकांपासून कोरोना विषाणुचा संसर्ग होऊ शकतो ही बाब हेरून शिखर संस्थानच्या विश्वस्त समितीने पुढील आदेश प्राप्त होई पर्यंत वरील दोन्ही मंदिरे अनिश्चित काळासाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

COMMENTS