दिंद्रुड दि.26 (प्रतिनिधी) :- छोट्या छोट्या घटकांत विभागलेल्या भटक्या विमुक्त समाजाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे स्व.मुंडे साहेबांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांच्या विचारांचा पाईक म्हणून त्यांच्या न्याय व हक्कासाठी लढणार असल्याची ग्वाही बंडू खांडेकर यांनी दिली. स्नेहीजनांकडून आयोजित सत्कार समारंभात ते बोलत होते.
माजलगाव तालुक्यातील दिंद्रुड येथे गावचे भूमिपुत्र बंडू खांडेकर यांची भाजप भटके विमुक्त प्रकोष्ठाच्या मराठवाडा अध्यक्षपदी (संयोजक) निवड झाल्याबद्दल सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाचे माजी प्रमुख ओमप्रकाश शेटे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून जेष्ठ भाजप नेते डॉ.भगवानराव सरवदे, महाराष्ट्र केसरी शिवाजी केकान, शिवपार्वती साखर कारखान्याचे चेअरमन पांडुरंग सोळंके, न.प.भाजप गटनेते विनायक रत्नपारखी, हनुमंत कदम, माजी जि.प.सदस्य विलासराव बडे, ईश्वर खुरपे, ऍड.सुरेश दळवे, अर्जुनराव वनवे, दिलीप पारेकर आदींची उपस्थिती होती.
भटक्या विमुक्तांचे प्रश्न शासन दरबारी मांडून त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी पक्ष व नेतृत्वाने बंडू खांडेकर यांना मोठी जवाबदारी दिली आहे. मात्र संघटन कौशल्य व परिश्रम करण्याची तयारी याच्या बळावर या पदाला ते निश्चितच न्याय देतील असा विश्वास ओमप्रकाश शेटे यांनी व्यक्त केला. यावेळी डॉ.भगवानराव सरवदे, विलासराव बडे,हनुमंत कदम, गिरीष थावरे आदींची समयोचित भाषणे झाली.
माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील, राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे, खा.प्रीतमताई मुंडे, प्रदेश संयोजक माजी आमदार नरेंद्र पवार, प्रदेश सहसंयोजक अशोक चोरमले, महिला आघाडीच्या संयोजक डॉ.उज्वलाताई हाके, भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के, आदी नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली भटक्या विमुक्त जाती जमातीतील लोकांच्या उन्नतीसाठी निष्ठेने काम करण्याची ग्वाही बंडू खांडेकर यांनी सत्काराला उत्तर देतांना दिली.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रदीप ठोंबरे, नागेश ठोंबरे, दत्तात्रय शिंदे, नागेश कानडे, महादेव कुंडकर, मारोती दूनगे, शंकर चांदबोधले, संतोष काळे, एकनाथ हंगरगे, राम देशमाने, आदी कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. सूत्र संचलन विष्णू नेमाटे यांनी तर आभार उत्तरेश्वर खताळ यांनी मानले. यावेळी स्नेहीजन व हितचिंतक यांची आवर्जून उपस्थिती होती.
COMMENTS