राम दातीर
माहूर (प्रतिनिधी )तिकीट मशीन मध्ये बिघाड आल्याने चुकीचे तिकीट दिल्या गेले आणि नेमके तेच तिकीट तपासणी पथकाच्या हाती लागले.त्यामु़ळे चार वर्षे प्रामाणिकपणे सेवा देवूनही आपल्यावर कार्यवाहीत होईल, सोयरे-धायरे,मित्र व एस.टी.महामंडळ परिवारात आपली नाहक बदनामी होईल या भीती पोटी माहूर एस.टी.आगाराचे वाहक संजय संभाजी जानकर (55 )रा.वाघी जि.नांदेड यांनी शुक्रवार दि.26 फेब्रु.रोजी सकाळच्या दरम्यान आगाराच्या आवारात उभ्या असलेल्या एस.टी.(क्र.एम एच- 20 बीएल -4015 )मध्ये गळ्याला फास लाऊन आपली जिवन यात्रा संपविली.
दि.24 फेब्रु.रोजी सदर वाहक हे माहूर -नांदेड फेरीवर असताना त्यांनी महागांवच्या प्रवाशांकडून पैसे पूर्ण घेतले,मात्र तिकीट धनोड्या पर्यंतचेच दिल्याची बाब तपासणी पथकाच्या तपासणीत निष्पन्न झाले होते.त्याप्रकरणी त्यांची चौकशी सुरू होती. पोलीसांनी पंचनामा केला असून प्रेत उत्तरीय तपासणीसाठी ग्रामीण रूग्णालयात पाठविले आहे, मृत जानकर यांच्या खिशात चिट्ठी सापडली असल्याची माहिती आगार प्रमुख व्ही.टी.धुतमल यांनी दिली.
नादुरुस्त तिकीट मशीन संजय जानकर यांच्या आत्महत्येस कारणीभूत ठरल्याची बाब त्यांनी लिहून ठेवलेल्या चार पानी पत्रातून उघड झाली असून त्यांच्या मृत्युने सर्वत्र हळहळ व्यक्त केल्या जात आहे.

COMMENTS