माजलगाव/प्रतिनिधी
श्री राम जन्म भूमि मंदिर निर्माण अभियान अंतर्गत येथील मॉ वैष्णवी मंगल कार्यालयात तालूक्यातील जिल्हा परिषद शिक्षकांचा मेळावा संपन्न झाला.
या मेळाव्याची सुरुवात भगवान प्रभू रामचंद्रांचे पूजन करून झाले. यावेळी अध्यक्ष म्हणून प्रा अशोक होके (जिल्हा सहप्रमुख), प्रमुख मार्गदर्शक आनंद गुजर(कार्यवाह- राष्ट्रीय स्वयंसेवक संघ लातूर विभाग), त्र्यंबकराव बादाडे (उपक्रमशील मुख्याध्यापक, जि प प्रा शा मालीपारगाव) इत्यादी उपस्थित होते.
यावेळी राम जन्मभूमी मंदिर निर्माण अभियान विषयी सविस्तर माहिती आनंद गुजर यांनी दिली तसेच मुकुंद जोशी यांनी शिक्षकांच्या वतीने प्रातिनिधिक स्वरूपात मनोगत व्यक्त केले, तसेच या अभियानात आम्ही सर्व जि प शिक्षक उत्स्फूर्त सहभाग नोंदवू असे सांगितले.
या मेळाव्याचे अध्यक्षीय समारोप प्रा अशोक होके, प्रास्ताविक सदाशिव ढगे, आभार कमलाकर झोडगे, सुत्रसंचालन शिवशंकर भंडारे यांनी केले, मेळाव्याची सांगता पसायदानाने झाली. यावेळी तालुक्यातील जि प शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते. हा मेळावा यशस्वी करण्यासाठी परमेश्वर आदमाने,अतुल मुगळीकर, रामेश्वर कुंभार, राहुल नाईक, शिरीष देशमुख, प्रा डॉ गजानन होन्ना, प्रा लक्ष्मीकांत सोन्नर, विशाल ठोसर, श्री काकडे, श्री जोशी यांनी प्रयत्न केले.

COMMENTS