*अहोरात्रपणे इतरांच्या सुखासाठी प्रयत्न करणारे समाजामध्ये फार दुर्मीळ व्यक्ती असतात त्यापैकीच एक देवगुणी व्यक्तीमत्व म्हणजे सन्माननीय प्रा.मुंकुद बोकारे सर...... ज्यांनी माझ्या सारख्या शिक्षणक्षेत्रात येणाऱ्या असंख्य नवीन माणसाना आधार, विश्वास आणि सहकार्य करुन खंबीरपणे उभे केले. यासाठी बोकारे सरांनी कधी ज्याला आपण मदत करतोय तो व्यक्ती आपल्या ओळखीचा आहे का ? याचा विचारसुध्दा केला नाही पण मदत मागणार्या प्रत्येक व्यक्तीस अगदी शेवटपर्यत सहकार्य केले.... सरांचा स्वभावच खूपच छान आहे....... आम्ही तर त्यांना नेहमी म्हणतो की सर तुमचं व्यकीमत्वच Evergreen (सदाबहार) आहे. सरांचा आज वाढदिवस आहे व त्यांची वयाची ६० वर्षे पुर्ण झाली पण सरांचा उत्साहाह आजही २५ वर्षाच्या नवतरुणाला लाजवेल इतका प्रचंड आहे. खर म्हणजे सरांच्या बाबतीत तर मला असे म्हणावं वाटतय की, सर सेवेत असतानाही माझ्या सहकारी बांधवाची कामे झाली पाहिजेत म्हणून धडपड करायचे व तीच धडपड किंवा तळमळ सरानी निवृत्ती नंतरही कायम ठेवली. सरांसारखी माणसे पुन्हाही जास्त वेळ देऊन उत्साहीपणे आणखीन जास्त जबाबदारीने शिक्षणक्षेत्रात कायमच कार्यरत आहेत. आजही त्यांच्या मोबाईलची पहिली रिंग वाजल्याबरोबर सर फोन उचलतात व अतिशय उत्साहाने सर बोलतात. असे आमच्या सर्वाचे सन्माननीय , विद्यार्थी प्रिय, समाजशील व्यक्तीमत्व, माझे आदर्श आणि गुरुतुल्य व्यक्तीमत्व सन्माननीय प्रा.मुकुंद बोकारे सरांना भावी आयुष्य सुखी, समाधानी, निरोगी, उंदड दिर्घायुष्यी लाभो हीच इश्वरचणी मनपूर्वक प्रार्थना .*
शुभेच्छुक
🙏🏻 *प्रा.संतोष हुडगे जिल्हा सहसचिव, जुक्टा महासंघ, लातूर*

COMMENTS