नायगांव प्रतिनिधी ( रामप्रसाद चन्नावार )
कुंटुर परिसरातील मौजे सुजलेगाव येथील नटराज सांस्कृतिक कला पथक सुजलेगाव तालुका नायगांव या कलापथकाने दिनांक 31 जानेवारी 2021 रोजी कुंटुर येथे कार्यक्रमाला सुरुवात केली .या कार्यक्रमांमध्ये महाराष्ट्र राज्य जनसंपर्क महा संचालनालय मुंबई 32 व जिल्हा माहिती कार्यालय नांदेड या संचालनालयामार्फत शासनाच्या लोककल्याणकारी विविध योजनेची माहिती सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी च्या अनुषंगाने वरील पथनाट्य व गीताच्या माध्यमातून गावातील सर्वसामान्य लोकांना प्रबोधन केले .त्यामध्ये covid-19 महामारी व भयानक बिमारी ला आळा बसण्यासाठी गीताच्या माध्यमातून जनतेला सावध केले. वेळोवेळी साबणाने हात धुणे,अथवा नाकाला तोंडाला मास वापरावा किंवा रुमाल वापरावा, सॅनिटायझर चा वापर करावा, गर्दीमध्ये जाण्याचे टाळावे ,व नियमाचे पालन करावे, असे म्हणून मनोरंजन चार माध्यमातून जागरूक केले .व मोलाचे प्रबोधन करून गावकऱ्यांना जागृत केले आहे. तसेच महाराष्ट्र जनसंपर्क महासंचालनालय शासनाच्या वतीने कोरोनावर मात करण्यासाठी लसीकरण व गोदावरी प्रदूषण नियंत्रण गीताच्या माध्यमातून जनजागृती केली आहे. कार्यक्रमाकरिता सादर केलेल्या सहभागी कलाकार पुढील प्रमाणे आहेत. शाहीर बळीराम दिगंबर जाधव , गायक माधव लक्ष्मण पवार ,गायक गंगाधर संभाजी वाघमारे, पार्श्र्वगायका पुजा आरळक आईलवार,यंकट शिवलिंग पांचाळ,झांज वादक लक्ष्मीबाई रामराम बोरवाड, ढोलकी वादक गंगाधर वाघमारे,आरगन वादक गंगाधर वाघमारे, बालाजी जाधव, आदी नी कार्यक्रम केला आहे.

COMMENTS