मुंबई | राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचे आरोप झाले आणि नंतर आरोप करणाऱ्या महिलेने ते आरोप मागे घेतले. मात्र अजूनही विरोधकांकडून धनंजय मुंडे यांना लक्ष केल जात आहे.मुंडे प्रकरणांच मी राजकीय भांडवल केल नाही आणि करणारही नाही अशी प्रतिक्रिया पंकजा मुंडेंनीसुद्धा दिली आहे.मात्र भाजपचे इतर नेते धनंजय मुंडेंची पाठ सोडत नाहीये. त्यांच्यावर टीका केली जात आहे.
या सगळ्या प्रकरणावरून आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विरोधकांना थेट जाहीर इशाराचं दिला आहे.’आधी विरोधकांनी मुंडेंवर आरोप केले. नंतर तोंडघशी पडल्यावर आता वेगळा आरोप केला आहे. विरोधकांचं टीका करणं हे काम आहे. पण ती टिका नेमकी कोणत्या पातळीपर्यंत असावी याला मर्यादा आहेत, असं सांगतानाच मागच्या काळात कुणी काय लपवाछपवी केली सांगू का? असा इशारा त्यांनी दिला. कुणाला किती मुलं होती. कुणाचं लग्न झालं होतं, झालं नव्हतं, हे सांगू का? अशा बऱ्याच गोष्टी मला माहीत आहे, सांगायलाच हव्या का? असा सवालही त्यांनी केला.

COMMENTS