मुतन्याळ येथील अल्पसंख्याक परिवारावर हिंसाचार करणाऱ्या मुख्य सुत्रधारांवर कडक कार्यवाही करावी

ऑल इंडिया तंझीम-ऐ- इंसाफ धर्माबादची मागणी धर्माबाद (अहमद लड्डा) मुतन्याळ ता.बिलोली येथील हिंसाचारास जबाबदार जातीयवादी धर्मांध लोकांवर व मुख्...


ऑल इंडिया तंझीम-ऐ- इंसाफ धर्माबादची मागणी

धर्माबाद (अहमद लड्डा) मुतन्याळ ता.बिलोली येथील हिंसाचारास जबाबदार जातीयवादी धर्मांध लोकांवर व मुख्य सूत्रधाराच्या विरोधात कारवाई करण्यात यावी अशी मागणी आज ऑल इंडिया तंझीम- ऐ-इंसाफ च्या वतीने करण्यात आली आहे.

गेल्या १६ जानेवारी रोजी बिलोली तालुक्यातील मौजे मुतन्याळ येथे ग्रामपंचायत निवडणूकीच्या कारणाने मतदानच्या दिवशी तणाव निर्माण झाला होता. शनिवार दि. १६ जानेवारी रोजी सकाळी १० च्या सुमारास मुतन्याळ येथे घटनेच्या मुख्य सुत्रधाराने "सगरोळी, चिंचाळा, पोखर्णी" गावातील समाजकंटक युवकांना भडकावून स्थानिक जातीयवादी धर्मांध व्यंक्तीच्या सोबत मिळून मुस्लिम समाजाच्या वस्तीत घरात घुसुन लाठी-काठीने व शस्त्राने मारहाण करण्यास सुरुवात केली, यात अनेक जण जखमी तर काही जण गंभीर जखमी झाले होते जखमींना बिलोली व देगलुर येथील रूग्णालयात प्राथमिक उपचार करुन गंभीर जखमींना पुढील उपचारासाठी नांदेड येथे रेफर करण्यात आले. 

     मौजे मुतन्याळ येथे पोलिस कर्मचाऱ्यां समक्ष मारहाण करण्यात आली. याप्रकरणि बडुर येथील व्यक्तीने व्हाईस ध्वनी, आडियो क्लिप समाजमाध्यमाद्वारे जातीयवादी धर्मांध युवकांना कायदा - सुव्यवस्था बाधीत करण्यासाठी परावृत केले आहे. धर्मांध जमावाने पोलिस कर्मचाऱ्यां समक्ष दगडफेक करीत गावात तणाव निर्माण करुन मुस्लिम समाजातील व्यक्तीना जीवे मारण्याचा प्रयत्न केला आहे. उलट राखिव दलाचे जवान गावात दाखल होताच निष्पाप मुस्लिम व्यक्तींना पकडून अटक केलेली आहे, आणि त्या निर्दोष वक्तीवर केलेले खोटे गुन्हे मागे घेवून न्याय द्यावा व त्या मुख्य सुत्रधाराविरुद्ध कडक कार्यवाही करावी व या घटनेची तात्काळ उच्चस्तरीय चौकशी करुन मुतन्याळ येथील जातीय तणाव निर्माण करणाऱ्या, व कायदा-सुव्यवस्था बाधीत करणाऱ्या जातीयवादी मानसिकतेच्या आरोपींना तात्काळ अटक करुन कडक पोलिस कारवाई करावी असे लेखी निवेदन ऑल इंडिया तंझीम ऐ इंसाफ च्या वतीने देण्यात आले यावेळी, धर्माबाद ऑल इंडिया तंझीम-ऐ- इंसाफ चे तालुका अध्यक्ष सय्यद अल्ताफ,संघटक माजीद अहेमद(समीर भाई),ता उपाध्यक्ष आरिफ भाई,ता सचिव नवीद अहेमद,शहर अध्यक्ष मोहम्मद मुबशीर,सय्यद इमरान पटेल,डॉ मसूद सहाब,ऐजाज़ भाई,मिर्ज़ा खुर्रम बेग, ता मीडिआ प्रमुख रज़्ज़ाक सर,यूनुस भाई आणि सद्दाम भाई, आदींच्या साक्षऱ्या आहेत.

COMMENTS

[विशेष न्युज]$hide=post

Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Read more Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content
×
व्हॉट्सअपवर अपडेट्स मिळवण्यासाठी येथे क्लिक करा Join Channel