केज प्रतिनिधी
दिल्ली येथे केंद्र शासनाने पारित केलेल्या तीन कृषी कायद्या विरोधात दोन महिन्यापासून शेतकरी आंदोलन करत आहेत मात्र केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या आंदोलनाची दखल न घेता ते आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न करत आहे नव्याने पारित केलेले तीन कृषी विधयक तात्काळ रद्द करावेत स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू कराव्यात महाराष्ट्रात सक्तीची विज वसुली थांबवा ,या मागणीसाठी दिल्लीच्या आंदोलनाला पाठिंबा म्हणुन केज शहरात 26 जानेवारी सकाळी 8 वाजता आंबेडकर चौक येथे दिल्ली आंदोलनात शहीद झालेल्या शेतकऱ्यांना श्रद्धांजली देऊन मंगळवार पेठ धारूर चौक मेन रोड मार्गी तहसील कार्यालयावर भाई मोहन गुंड यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने ट्रॅक्टर मोर्चा काढण्यात येणार आहे असल्याची माहिती शेकापचे तालुका चिटणीस भाई प्रवीण खोडसे भाई अशोक रोडे भाई मंगेश देशमुख भाई महेश गायकवाड भाई अशोक डोंगरे बाबाराजे गायकवाड शाम चिचोलीकर हानुमंत मोरे राज तपासे यांनी दिली.
COMMENTS