हि निवडणुक कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक दत्ताहारी पा.आवरे यांच्या नेतृत्वाखाली लढविण्यात आली.
धर्माबाद (अहमद लड्डा) 'तालुक्यातील चिकना ग्राम पंचायत निवडणुकीत नऊ पैकी सहा जागेवर पहिल्यांदाच नवीन उमेदवार निवडुन आले असुन नऊ जागे पैकी जास्तीत जास्त जागेवर आपले उमेदवार निवडुन आणलेल्या शेतकरी शेतमजुर ग्राम विकास पँनल ने चिकना ग्राम पंचायतवर आपले वर्चस्व निर्माण केले आहे.
या निवडणुकीत नऊ जागे पैकी वार्ड नंबर एक मधील अनुसुचित जमातील उमेदवार बिनविरोध काढण्यात आले असुन आठ जागे साठी पंधरा उमेदवार रिंगणात होते .
विशेष यापुर्वीचे माजी ग्राम पंचायत सदस्य शेख ईब्राहीम यांनी या निवडणुकीत सात उमेदवार रिंगणात उतरविले होते. त्यापैकी दोनच उमेदवार निवडुन आले असुन त्यांचे अन्य सहा उमेदवार माञ पराभुत झाले आहेत . दरम्यान शेतकरी शेतमजुर ग्राम विकास पँनलच्या माध्यमातुन पहिलांदाच नविन चेहऱ्यानां संधी मिळाली असल्याने ते मोठ्या उत्साहाने कार्यरत राहुन गावातील विकास कामे मार्गी लागतील अशी अपेक्षा काही जेष्ठ नागरिक पँनलचे अध्यक्ष गंगाधर पाटील आवरे व पँनल प्रमुख दत्ताहारी पा.आवरे ,शेख हुसेन साहब ,दशरथ रामजी पा.आवरे देविदास आवरे, दत्ताहारी गंगाधर पा.आवरे ,दत्तराम पा.ढेले ,आवरे शेषेराव पा. ,यादव खंदारे ,शेख वलीयोदीन ,पोशेट्टी दुर्शनवाड ,अनेक नागरीकामधुन व्यक्त केली जात आहे . या वेळी निवडुन आलेलेल्या आठ पैकी सहा व दोन उमेदवार पराभुत झालेल्या सर्व उमेदवारांचे पहील्या प्रथम नवनिर्विचित सरपंच पदभुषविणारे सौ सुमनबाई विश्वास आवरे ,यांचे चिकना गावकर्यानी जंगी स्वागत करण्यात आले असुन व पुढील सौ सुर्वणाबाई गंगाधर कदम ,देविदास साहेबराव दुड्डे, सदीप दत्ताहरी आवरे ,सौ.कौसर बेगम रियाजोदीन ,सौ सरुबी अ.खादर .पराभुत झालेले उमेदवार सौ.रमाबाई वाघमारे व गंगाराम कवडेकर या सर्वांचे चिकना गावकऱ्यानीं जंगी स्वागत करुन पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या आहेत.

COMMENTS