नायगांव प्रतिनिधी ( रामप्रसाद चन्नावार )
नुकतीच पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत सलग तिसऱ्यांदा 9 पैकी 9 जागेवर विरोधी गटाचा चुराडा करीत प्रचंड मतांनी विजयश्री खेचून आपल्या गटाच्या विजयाची हट्रिक प्रस्थपित केली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, बेंद्री नगरीचे माजी सरपंच जिल्ह्याचे खा.प्रताप पाटील चिखलीकर यांचे पुतणे सचिन पाटील बेंद्रीकर यांनी सलग तिसऱ्यांदा ग्रामपंचायत निवडणुकीत ही आपली बेंद्री नगरीत एक हाती सत्ता स्थापन करून आपल्या राजकीय कार्याची छाप पुन्हा प्रस्थपित केली आहे.
सचिन पाटील गटाची निवडणूक बेंद्रीकर यासाठी प्रतिष्ठेची व अटीतटीची होईल असे विरोधकांनी चित्रे भासवल्या गत निवडणूक प्रचार केला तरी गावकऱ्यांनी सचिन पाटील गटाचा एक तर्फी दणदणीत विजय मिळवून दिल्याने सचिन पाटील बेंद्रीकर गटावर पुन्हा विश्वास टाकून त्यांच्या सामाजिक कार्याची पोहच दिली असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यांच्या या विजया बद्दल खा. प्रताप पाटील चिखलीकर, माजी सभापती प्रवीण पाटील चिखलीकर, जिल्हा परिषद सदस्या प्राणितीताई देवरे, भाजप आ. राजेश पवार, आ.राम पाटील रातोळीकर, भाजपा नेते बालाजी बच्चेवार, श्रावण पाटील भिलवंडे, शिवराज पाटील होटाळकर, यांसह जिल्हाभरातील सामाजिक कार्यकर्ते नेते व आप्त स्वकीय व गावकरी यांच्यावतीने शुभेच्छा देऊन हार्दिक अभिनंदन करण्यात आले.
*बेंद्रीकर गटाचे विजयी शिलेदार.....*
सचिन भगवानराव बेंद्रीकर,शोभाताई भगवानराव गायकवाड, नागोराव शंकरराव कदम,जयश्री सदाशिव भोसकर, शिवकांता बाबुराव मंगरुळे, अनुसया शिवाजी कदम,लक्ष्मी बाई प्रल्हाद कोम्पलवर,गौतमबाई शेषेराव हणमंते,गिरमाबाई दिगंबर सूर्यवंशी.

COMMENTS