महाराष्ट्र जनता दल (से) युवा प्रदेशाध्यक्ष नाथाभाऊ शेवाळे यांच्या एका कार्यकर्त्यांची संघर्षमय गाथा "नाथा" या पुस्तकाचे प्रकाशन दि...
![]() |
महाराष्ट्र जनता दल (से) युवा प्रदेशाध्यक्ष नाथाभाऊ शेवाळे यांच्या एका कार्यकर्त्यांची संघर्षमय गाथा "नाथा" या पुस्तकाचे प्रकाशन दिल्ली येथे माजी पंतप्रधान एच.डी देवेगौडा साहेब यांच्या निवासस्थानी पार पडला.यावेळी माजी पंतप्रधान एच.डी.देवेगौडा साहेब , माजी पंतप्रधान व्ही.पी सिंग यांच्या पत्नी राणीसाहेब सितादेवी आणि बसपा संसद नेते खासदार मा.कुंवर दानिश अली, सुशिलाताई मोराळे, ललितदादा रूणवाल आदी मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थितीत होते. *नाथाभाऊ शेवाळे यांचा नाथा या पुस्तक प्रकाशनाचा कार्यक्रम ठरला ऐतिहासिक क्षण*
मुंबई : नेहमीच विविध हितकारक आणि लोकांना अपेक्षित असे काम करत असताना महाराष्ट्र मध्ये प्रसिध्द असलेले जनता दल (से) युवा प्रदेशाध्यक्ष मा.नाथाभाऊ शेवाळे (साहेब) यांनी कोरोनाच्या काळात एक पुस्तक लिहले होते.त्या पुस्तक प्रकाशन कार्यक्रम आज दिल्ली मध्ये मा.देवेगौडा साहेब यांच्या निवासस्थानी पार पडला.देशाचे माजी पंतप्रधान आणि जनता दल (से) राष्ट्रीय नेते मा.एच.डी देवेगौडा (साहेब) देशाचे माजी पंतप्रधान मा.व्ही.पी सिंग यांच्या पत्नी मा.राणीसाहेब सितादेवी आणि संसद मधील बसपा पार्टीचे नेते खासदार मा.कुंवर दानिश अली.व इतर मान्यवर यांच्या उपस्थितीत पार पडला.
पुस्तक प्रकाशन वेळी देवेगौडा साहेब बोले नाथाभाऊ माझे कुटुंबातील सदस्य आहेत.त्यांचा राजकिय प्रवास खूप संघर्षमय असून राज्यतील त्यांचे काम भरीव असून माजी ताकद कायम त्यांच्या सोबत आहे.तसेच खासदार दानिश अली साहेब बोले नाथाभाऊ माझे भाऊ असून खूप दिवसाचे त्यांचे आणि माझे सबंध आहेत.त्यांचे पुस्तक प्रकाशन मा.देवेगौडा साहेब यांच्या हस्ते पार पडला हा ऐतिहासिक क्षण आहे.नाथाभाऊ हे चळवळीतील नेते असून मी एक भाऊ म्हणून त्यांच्या सोबत कायम आहे.यावेळी सुशीलाताई मोराळे, ललितदादा रुनवाल व इतर मान्यवर उपस्थित होते.

COMMENTS