लेखणी च्या माध्यमातून जनतेला न्याय विकासाचे प्रश्न मार्गी लावण्याचे काम पत्रकारांनी करावे ---‐-- सोनखेडकर


नायगांव प्रतिनिधी ( रामप्रसाद चन्नावार )

काळा नुसार लोकांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. म्हणून निर्भीडपणे पत्रकारिता करतांना आपल्या लिखाणाच्या माध्यमातून जन सामान्यांना न्याय मिळतो.तसेच ग्रामीण भागातील विकासाचे कामे मार्गी लागतात. मात्र पत्रकारवर संकट आले की,एकही राजकीय पुढारी अथवा सक्षम अधिकारी ठामपणे पुढे येत नाही.म्हणून पत्रकारांचा संरक्षणाचा लढा चालू असून ग्रामीण भागातील पत्रकारांनी एकोप्याने राहून ग्रामिण भागातील मूलभूत प्रश्न मार्गी लावण्यासाठी तुमची वाचा नव्हेतर तुमची लेखणी बोलली पाहिजेत असे मत पत्रकार संघाचे माजी जिल्हाध्यक्ष सूर्यकांत सोनखेडकर यांनी दर्पण दिनाच्या अध्यक्षस्थानी भाषणातून बोलतांना व्यक्त केले.



     नायगांव तालुका मराठी पत्रकारसंघाच्या वतीने पत्रकारसंघाचे माजी जिल्हाध्यक्ष सूर्यकांत सोनखेडकर यांच्या अध्यक्षतेखाली बाळशास्त्री जांभेकर यांनी ६ जानेवारी १८३२ रोजी दर्पण हे नियतकालिक सुरू करून मराठी वृत्तपत्राचा मुहूर्तमेठ रोवली म्हणून त्यांच्या लेखनाचा वारसा सशक्तपणे पुढे नेणाऱ्या तमाम ग्रामीण भागातील पत्रकारांना एकत्रित करून त्यांच्याशी संवाद घडवून एकमेकांना दर्पण दिनाच्या शुभेच्छा देत प्रजावणीच्या कार्यल्यात उत्स्फूर्तपणे दर्पण दिन साजरा केला.

      याप्रसंगी मराठी पत्रकारसंघाचे सदस्य गजनान चौधरी,पत्रकार संघाचे अध्यक्ष सय्यद जाफर,सरचिटणीस पंडीत वाघमारे,माधव चव्हाण,गंगाधर भिलवंडे, मनोहर तेलंग,सुभाष पेरकेवार,दिलीप वाघमारे,प्रकाश हणमंते,पंडित वाघमारे,वसंत जाधव,रामप्रसाद चन्नावार,गंगाधर गंगासागरे,गोविंद टोकलवाड,

केरबा रावते,आनंद सुर्यवंशी सर,अनिल कांबळे, बालाजी हणमंते,गंगाधर ढवळे, बालाजी शेवाळे,मारोती बारदेवाड,शेख आरीफ,चंद्रकांत सुर्यतळ, विरेंद्र डोंगरे,विश्वांभर वन्ने,प्रशांत वाघमारे, रामराव ढगे ,संभाजी वाघमारे, पवन पुठेवाड,बाळासाहेब शर्मा,किरण वाघमारे, रमेश ढवळे,शिवाजी पन्नासे. सुधाकर भद्रे.अब्दुल करीम चाऊस.सह शेकडो ग्रामीण भागातील पत्रकार मोठ्या संखेने उपस्थित राहून दर्पण दिन मोठ्या उत्स्फूर्तपणे साजरा केला.या वेळी कार्यक्रमाचे धारदार सुञसंचलन प्रकाशभाऊ हणमंते तर आभार शेषराव कंधारे यांनी मानले .


टिप्पण्या