जिल्हा प्रतिनिधी- महेंद्र पुरी, हिंगोली
हिंगोली शहरातील गंगानगर भागात गोसावी समाजातील महिलांच्या वतीने मकरसंक्रांतीच्या निमित्ताने हळदी कुंकू कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी हिंदू धर्मगुरू दशनाम गोस्वामी आखाडा संघटनेच्या महिला जिल्हाध्यक्ष नयना गिरी यांनी महिलांना पैशाची बचत करून गरजवंतांना मदत करण्याचा संदेश दिला आहे
गंगानगर भागात मागील तीन वर्षांपासून या मंडळाच्या वतीने हळदी कुंकू कार्यक्रम घेऊन विविध सामाजिक उपक्रम राबवीले जातात यावर्षी मात्र कोरोना महामारी ने जनजीवन विस्कळीत झाले असुन मजुर, गोरगरीब, कामगार वर्ग चांगलाच अडचणीत सापडला आहे. अशा गरजवंतांना फुल नाही फुलाची पाकळी मदत म्हणून करण्यासाठी हिंदू धर्मगुरू दशनाम गोस्वामी आखाड्याच्या महिला जिल्हाध्यक्ष नयना गिरी यांनी महिलांना संक्रातीचे वाण म्हणुन गल्ला वाटप करीत यामध्ये पैसे जमा करून गरजुंना मदत करण्याचे आवाहन केले आहे. त्यांच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे. यावेळी जिल्हाध्यक्ष नयना गिरी, उपाध्यक्ष कल्पना गिरी, जिल्हा महामंत्री राधाबाई गिरी, सह महामंत्री वर्षा गिरी, कार्याध्यक्ष आशा गिरी, कोषाध्यक्ष सिता पुरी, सिमा पुरी यांच्या सह महिला पदाधिकारी यांची उपस्थिती होती

COMMENTS