जिल्हा प्रतिनिधी -महेंद्र पुरी हिंगोली
हिंगोली तालुक्यातील नर्सी पोलिस ठाणे सर्वात लहान पोलिस ठाणे असुन एका महिन्यापुर्वी नर्सी पोलिस ठाण्याची जबाबदारी हिंगोली जिल्हयाचे कर्तव्यदक्ष पोलिस अधिक्षक राकेश कलासागर यांनी सहाय्यक पोलिस निरीक्षक सुनिल गिरी यांच्या वर सोपवली आणि पोलिस अधिक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली ठाण्यात रूजु होताच अवघ्या एका महिन्यात सुनिल गीरी यांनी ठाण्याचा कयापालटच करून टाकला. २० जानेवारी रोजी नांदेड परिक्षत्राचे विशेष पोलिस उपमहानिरीक्षक निसार तांबोळी यांनी नर्सी पोलिस ठाण्याला धावती भेट दिली असता ठाण्याचा परिसर बघुन सपोनी सुनिल गिरी यांचे कौतुक केले तसेच काही मार्गदर्शक सुचना दिल्या. सुनिल गिरी हे मागील एक महिन्यापुर्वी परभणी जिल्हयातुन हिंगोली येथे बदलीवर आले. हिंगोलीत रूजु होताच पोलिस अधिक्षक राकेश कलासागार यांनी सपोनी सुनिल गिरी यांच्यावर नर्सी पोलिस ठाण्याची जबाबदारी सोपवली त्यानंतर
नर्सी पोलिस ठाण्यात रूजु होताच सुनिल गीरी यांनी ठाण्याच्या परिसरात स्वच्छता मोहीम राबउन हॉलीबॉल ग्राउंड, वाकींट ट्रेक, क्रिकेट स्पीच ची निर्मीती केली. तसेच ठाण्याच्या परिसरात विविध वृक्षाची लागवड करून निसर्गमय वातावराणाची निर्मिती केली. ठाण्यात येणार्या फिर्यादीला सन्मानपुर्वक वागणुक देउन त्याची अडचण समजाउन घेण्याचे सर्व कर्मचार्यांना सुचना दिल्या. तसेच ग्रामपंचायत निवडणुक काळात गावातील प्रतिष्ठीत नागरिकांच्या बैठका घेउन निवडणुकीत कुठलेही भांडण तंटे न होउ देता शांतता पुर्ण वातावरणात निवडणुका पार पाडल्या. ठाण्यातील क्राईम रेकॉर्ड, ईमारत स्वच्छतेवर भर दिला, गुन्हे तपासात गती निर्माण केली, पेंडींग गुन्हे तात्काळ निकाली काढले. नांदेड परिक्षत्राचे विशेष पोलिस उपमहानिरीक्षक निसार तांबोळी हे वार्षीक तपासणी दौर्यावर असतांना सेनगाव येथे तपासणीसाठी जात असतांना नर्सी पोलिस ठाण्याला अचानक भेट देवून पाहणी केली असता सुनिल गिरी यांच्या कामगिरी चे कौतुक करीत काही मार्गदर्शक सुचना दिल्या


COMMENTS