माजलगाव प्रतिनिधी
म.शि. प्र.मंडळाच्या सुंदरराव सोळंके महाविद्यालयामध्ये डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नामविस्तार दिन साजरा करण्यात आला.
सुंदरराव सोळंके महाविद्यालयातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंबेडकर स्टडी सेंटरच्या वतीने आयोजित कार्यक्रमाचे उद्घाटक माजी आ. राधाकृष्ण होके पाटील होते तर अध्यक्षस्थानी प्राचार्य व्ही. पी. पवार होते.यावेळी उपप्राचार्य प्रकाश गवते, उपप्राचार्य पवनकुमार शिंदे, प्रबंधक प्रशांत चव्हाण,डॉ एन. के. मुळे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी बोलताना माजी आ. राधाकृष्ण होके पाटील म्हणाले की डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावामुळे मराठवाडा विद्यापीठाला गौरव प्राप्त झाला आहे. जातीवादी शक्तींनी नामांतराला विरोध केला परंतु शरद पवारांच्या नेतृत्वामुळे विद्यापीठाचा नामविस्तार झाला.विद्यापीठात शिक्षण घेताना डॉ बाबासाहेब आंबेडकरांची प्रेरणा विदयार्थ्यांनी घेऊन जीवनात वाटचाल करावी.
कार्यक्रमाचा अध्यक्षीय समारोप करताना प्राचार्य डॉ व्ही. पी. पवार म्हणाले की डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नामांतराचा लढा ऐतिहासिक आहे. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळे मराठवाड्यात उच्चशिक्षणाची दारे खुली झाली. त्यांच्या विचारांचा वारसा पुढे घेऊन जाणे देशासाठी हितावह आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. संजय बागूल यांनी केले तर उपप्राचार्य प्रकाश गवते यांनी आभार मानले.

COMMENTS