परभणी:( ) नांदेड जिल्हा टेबल टेनिस असोसिएशनच्या वतीने महाराष्ट्र राज्य टेबल टेनिस असोसिएशनच्या मान्यतेनुसार कोरोना प्रादुर्भावाचे सर्व नियमांचे व महाराष्ट्र शासनाच्या सर्व नियमांचे पालन करत दि. 10 व 11 जानेवारी दरम्यान जिल्हा क्रीडा संकुल नांदेड येथील विभागीय टेबल टेनिस क्रीडा स्पर्धात परभणी जिल्हा टेबल टेनिस असोसिएशनच्या साक्षी देवकते हिने तिहेरी मुकुट पटकावला.
या स्पर्धेत परभणीच्या साक्षी देवकते हिने कनिष्ठ मुली,युवा मुली व महिला या तीन गटांमध्ये विजेतेपद पटकावत तिहेरी मुकुट प्राप्त केला. तसेच पुरूष या गटामध्ये तुषार जाधव या खेळाडूने विजेतेपद पटकावले.परभणीच्या पियूष रामावत या खेळाडूने द्वितीय क्रमांक पटकावला.
युवा मुलांच्या गटामध्ये पियुष रामावत याने उपविजेतेपद पटकावले.
त्याचबरोबर उपकनिष्ठ मुले या गटामध्ये वरद लोहटने उपविजेतेपद पटकावले. तर शिवम करनाडे या खेळाडूने तृतीय क्रमांक प्राप्त केला. कॅडेट मुलींच्या गटात वेदांगी जुमडे हिने विजेतेपद पटकावले तर कॅडेट मुलांच्या गटात स्मित करेवार खेळाडूने उपविजेतेपद पटकावले. तसेच युवराज सावने याने तृतीय क्रमांक प्राप्त केला. सदरील खेळाडुंना प्रशिक्षक चेतन मुक्तावार यांचे मार्गदर्शन लाभले.
परभणी जिल्ह्याच्या खेळाडुंना जिजाऊ ज्ञानतिर्थ शिक्षण संस्थेचे संचालक प्रा.नितीन लोहट यांच्या वतीने 32 खेळाडूना गणवेष देण्यात आला.
या स्पर्धेत सर्व नियमांचे पालन करत औरंगाबाद, नांदेड, बीड, परभणी जिल्ह्यातील 62 खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता. यातील विजयी खेळाडूंना विर्लपारले मुंबई येथे राज्य टेबल टेनिस क्रीडा स्पर्धा साठी 18 जानेवारी ला रवाना होणार आहेत.
या यशस्वी खेळाडूंच अभिनंदन जिल्हा अध्यक्ष समशेर भैय्या वरपुडकर, जिल्हाक्रिडाधिकारी नरेंद्र पवार, उपाध्यक्ष संतोष सावंत, कार्याध्यक्ष डॉ. प्रा.माधव शेजुळ, जिल्हा सचिव गणेश माळवे, सहसचिव डि.पी.पंडीत, केशव शिंदे, डॉ. विनोद गणार्चाय, डॉ. गुरुदास लोकरे, रामराव लोहट, यांनी करून पुढील स्पर्धेस शुभेच्छा दिल्या.

COMMENTS