नांदेड : दि .14 नांदेड जिल्हा हौशी अॅथलेटीक असोसिएशन , नांदेड यांच्यातर्फे व महाराष्ट्र अॅथलेटीक असोसिएशन पुणे यांच्या मान्यतेने नांदेड येथे रविवार दिनांक 17 जानेवारी 2021 सकाळी 10 वाजता संस्कृती संवर्धन मंडळ मैदान सगरोळी (श्री छत्रपती शिवाजी महाराज हायस्कूल सगरोळी)ता.बिलोली जि . नांदेड येथील मैदानावर जिल्हास्तरीय फक्त 14 ,16,18,20 वर्षाच्या आतील वयोगटातील मुले - मुली (11/02/2001 च्या नंतर चा जन्म व 11/2/2007 च्या आत जन्म असलेले ) खेळाडूंसाठी जिल्हास्तरीय मैदानी ( अॅथलेटिक्स ) स्पर्धेचे /निवड चाचणी चे आयोजन व राज्य स्तरीय स्पर्धेच्या निवड चाचणीचे आयोजन करण्यात आल्याची माहिती संघटनेचे सचिव प्रलोभ कुलकर्णी यांनी दिली . स्पर्धा साठी येतांना खेळाडूंनी सोबत नोंदणीसाठी दोन फोटो , मुळ आधार कार्ड, मुळ जन्म दाखला ( न . पा. किवा ग्रामपंचायत ) , प्रत्येक क्रीडा प्रकारासाठी १०० रू . शुल्क व नांव नोंदणी शुल्क १२५ रू . घेऊन उपस्थित राहावे .नोंदणी सकाळी 8 वाजता सुरू होईल राज्यस्तरीय ( अॅथलेटिक्स ) मैदानी स्पर्धेसाठी किमान कामगिरी पात्रता प्राप्त करणाऱ्या खेळाडूस राज्यस्तरीय स्पर्धेत सहभागी होता येईल.20वर्ष आतील राज्यस्तरीय स्पर्धा 20जानेवारी रोजी संपन्न होणार आहेत. तरी जिल्ह्यातील 100 , 200 , 400,1500,3000,5000,10000 की. मीटर धावणे , तसेच गोळाफेक , लांब उडी , उंच उडी , रिले . प्रकारामध्ये भाग घेणाऱ्या खेळाडूंनी जास्तीत जास्त संख्येने आवश्यक त्या तयारीनिशी उपस्थित रहावे कोविडच्या सर्व नियमांचे पालन खेळाडू व पालक यांनी करणे आवश्यक आहे.तसेच खेळाडूंनी पालक संमती पत्र सोबत आणने आवश्यक आहे असे आवाहन नांदेड जिल्हा हौशी अॅथलेटीक असोसिएशनचे अध्यक्ष राजे खंडेराव देशमुख पळशीकर , उपाध्यक्ष डॉ . अर्जुन मापारे , डॉ . दि . भा . जोशी , डॉ . उमेश भालेराव , नारायण सुर्यवंशी , कुमार कुलकर्णी , अॅड . अमरीक सिंग वासरीकर , अविनाश रामगीरवार , महेंद्र कुडगुलवार , राजेश कुलकर्णी , प्रशांत जोशी , निलेश ठक्कर , राजेश तिवारी , किशोर पाठक , विनोद गोस्वामी , प्रविण साले , प्रमोदराव देशमुख , सुनील देशमुख ,बंन्टी सोनसळे ,शारदा कदम , सुरेश पदमावार , रूपाली कुलकर्णी ,अर्चना धुरी, लोपमुद्रा आनेराव, प्रविण कुलकर्णी , किरण कुलकर्णी , पूनम नवघिरे ,संगिता कुलकर्णी ,कृष्णा तलवारे, भगवान नागरगोजे , विष्णू पूर्ण , शिवकांता देशमूख , प्रा डॉ बळीराम लाड , प्रा . अमृत जाधव , वैभव दोमकोंडवार , डी . डी . चव्हाण , काकडे मुंजाजी ,वाकोडे , सविता पतंगे ,लक्ष्मण फुलारी, नंदू जाधव, बालाजी गाडेकर , बालाजी भवानकर , शेख शबीर , भुजंग चिटटवार , संतोष सोनसळे , संतोष आनेराव, भाऊराव राठोड,विजय गव्हाणे, ज्ञानेश्वर कोंडलांडे, निलेश खराटे, बाळासाहेब पांडे आदी पदाधिकारी यांनी केले आहे . अधिक माहितीसाठी व नांव नोदणीसाठी संघटनेचे सचिव प्रलोभ कुलकणी 8623005600/ 8625021219 यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे .
COMMENTS