स्नेहीजन व बंधू भागिनी यांना नमस्कार
BY BY2020 व HAPPY NEW YEAR 2021या वर्षाचे स्वागताच्या निमीत्ताने आपण दिलेले प्रेम व सहकार्य याबद्दल सर्वांचे मनापासून आभार व्यक्त करतो व मागील काळात कळत नकळत माझ्याकडून आपले मन दुःखी झाले असल्यास आपली दिलगिरी व्यक्त करतो🙏🙏
2020 मध्ये सुरूवातीला मतदान स्तरीय अधिकारी BLO चे कामावर सामूहिक बहिष्कार टाकणे व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी फौजदारी गुन्हे दाखल करतो असे सांगीतले असतांना सुद्धा भरवसा ठेऊन सहकार्य केले . काम तर केलेच नाही व कारवाई सुद्धा झाली नाही . येथे आपल्या सर्वांचा विजय झाला .एकीचे बळ मिळते फळ🤝🏻🤝🏻🤝🏻
त्यानंतर लगेच मार्च मध्ये कोरोना सारख्या संसर्गजन्य जागतिक रोगाने आपल्या सर्वांना लॉक डाऊन केले . घरी रहा , सुरक्षित रहा या आव्हानाला प्रतिसाद दिला . या वाईट काळात काहींना बाधा झाली व ते त्यातून बरे झाले तर काहींना आपल्या कुटुंबीयांना , नातेवाईकांना मुकावे लागले . या दुःखात सहभागी असून ईश्वर आपणास दुःखातून सावरण्याची शक्ती देवो हीच प्रार्थना
कोरोना काळात सर्वात दुःखद बाब आपली व आपले चिमुकले विद्यार्थी यांची ताटातूट झाली . ऑनलाईन स्वाध्याय व स्वाध्याय पुस्तिका , पेपर , तसेच इतर प्रयत्न करून काही प्रमाणात शिक्षण सुरू ठेवले . लवकरच शाळा सुरु होवोत .
कोरोना मुळे मिळालेल्या वेळेत (सुटीत ) पारंपारिक व्यवसाय म्हणजे शेतीच्या कामाचा आनंद घेतला .
संघटनात्मक कामासोबतच सामाजिक उत्तरदायित्व म्हणून आपल्या सर्वांचे सहकार्याने , दानशूर वृत्तीमुळे प्रफुल्ल समाधान बोराटे या गरिब ,होतकरू व हुशार विद्यार्थाला MBBS प्रवेशासाठी लाखो रूपये जमा करून हातभार लावला व त्याला नगर येथील कॉलेजला प्रवेश मिळाला. तो आपल्यामुळेच🙏🙏
वर्षाच्या शेवटी 23 डिसेबंर ला वाढदिवसाच्या प्रत्यक्ष , अप्रत्यक्ष , समाज माध्यमाद्वारे मिळालेल्या शुभेच्छा .आपल्या सर्वांचे असेच प्रेम ,सहकार्य राहो हाच विनंती .
आपला कायमस्वरूपी ऋणी राहून आपल्याला व आपल्या परिवाराला नविन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा
2021 हे नाविन वर्ष सर्वांसाठी सुखाचे , समृध्दीचे , आरोग्यमय जावो हीच प्रार्थना .
🙏आपला ऋणी 🙏
सुभाष देवकर व परिवार
बुलडाणा

COMMENTS