परभणी (क्रीडा प्रतिनिधी) दि. ७ नोंव्हें. गेल्या ३८ वर्षांपासून आपण क्रीडा क्षेत्राशी जोडल्या गेलो असून, माझ्या आयुष्यातील चढ-उताराचे हेच क्षेत्र साक्षीदार आहे. आपल्या यशात या क्षेत्राचा व या क्षेत्रातील प्रत्येकाचा मोठा वाटा आहे. या क्षेत्राने आपली साथ कधीही सोडली नाही. त्यामुळे या क्षेत्राचेही आपण देणे लागतो. त्यातच कृषी विद्यापीठाच्या २५ एकर जागेवर बालेवाडीप्रमाणे अद्ययावत क्रीडा संकुल उभारणारच, अशी ग्वाही खासदार संजय जाधव यांनी दिली.शिवछत्रपती पुरस्कारप्राप्त क्रीडा संघटक प्रा.डॉ. माधव शेजुळ यांच्या निवासस्थानी जिल्ह्याच्या क्रीडा क्षेत्रात योगदान देणारे व क्रीडा शिक्षक, अधिकारी म्हणून निवड झालेल्यांच्या गौरव सोहळ्यात खासदार जाधव हे अध्यक्षस्थानावरून बोलत होते. त्यावेळी त्यांनी आपल्या क्रीडा व सांस्कृतिक क्षेत्रातील वाटचालीचा ऊहापोह केला.१९९० मध्ये आपण राजे संभाजी मित्रमंडळाची स्थापना केली. क्रीडा क्षेत्रातील डॉ. शेजुळ यांच्यासह अन्य मंडळींच्या सहकार्याने विविध क्रीडा स्पर्धा नियमितपणे घेत होतो. पैसा नव्हता पण जिद्द, ऊर्मी होती. आपण प्रयत्न केले तर यश मिळेलच, याची खात्री होती. यावेळी या क्षेत्रातील मंडळींनी मोलाची साथ दिली. उधार उसनवारी करूनप्रसंगी घरचे सोने मोडून सरबराई केली, हे सांगताना खा. संजय जाधव भावुक झाले. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या २५ एकर जागेस मंजुरी मिळाली आहे. परंतु, मध्येच शासन अदलाबदलीत हा विषय मागे पडला. परंतु, आता कुठल्याही परिस्थितीत या ठिकाणी आपण बालेवाडीप्रमाणे अद्ययावत क्रीडा संकुल उभारणारच. याप्रकरणी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही आश्वासन दिले आहे. दिवाळीनंतर यासंदर्भात मंत्रालयात बैठक असून, तेव्हा जागेसंबंधीच्या तांत्रिक अडचणी दूर होतील व प्रश्न मार्गी लागेल. जिल्ह्यात खूप गुणवान खेळाडू आहेत; परंतु सोयी-सुविधांच्या अभावामुळे ते पुढे जाऊ शकत नाही. परंतु, हे क्रीडा संकुल झाल्यास निश्चितच ऑलिंपियन घडतील, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपमहापौर गणेश देशमुख, ज्ञानसाधना प्रतिष्ठानचे अध्यक्ष किरण सोनटक्के, शिवछत्रपती पुरस्कारप्राप्त मंगल पांडे, नगरसेवक बालासाहेब बुलबुले आदींची उपस्थिती होती. प्रास्ताविक संयोजक प्रा.डॉ. माधव शेजुळ यांनी केले. शहरात चार दिशांना चार मिनी स्टेडियम उभारण्याची व परभणी फेस्टिव्हल सुरू करण्याची अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली. यावेळी मान्यवरांच्या हस्ते तालुका क्रीडा अधिकारी कल्याण पोले, प्रा.डॉ. अब्दुल अन्सार, महेंद्र खरे, राहुल अपसनवाड, कृष्णा तुरे, नीलेश पवार, चेतन मुक्तावार, रवी जोगळेकर, स्वप्निल घाडवे, तुषार जाधव, नृसिंह चाटे, मेघराज कांदे, संदीप धनले, शुभम जाधव, महेश काळदाते, विक्रम हतेकर व मनीषा बनसावडे यांचा ट्रॅक सूट व बॅग , शाल देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.सूत्रसंचालन संभाजी शेवटे यांनी केले, तर प्रा.डॉ. चंद्रकांत सातपुते यांनी आभार मानले.याप्रसंगी परभणी जिल्हातील एकविध क्रीडा संघटक सुदाम लाड, प्रा. मिनानाथ गोमचाळे, माणिक कदम, गणेश माळवे, देवीदास सोन्नेकर, रशीद मास्टर, तुकाराम ठोंबरे, प्रा. नवनाथ भालेराव, रामेश्वर पुरी, शेखर शेजुळ, किशन भिसे, गोपाळ मोरे, यमनाजी भाळशंकर, कैलास टेहरे, प्रा.अभिजीत कंडेरे, बाळू मुदगूलकर, आदी उपस्थित होते.
$type=grid$count=4$ico=1$cate=0$rm=0$sn=0=$hide=post$cm=0
[विशेष न्युज]$hide=post
/gi-clock-o/ Latest News$type=list$hide=post
-
महामंडळ कर्मचाऱ्यांच्या ७ व्या वेतन आयोगाच्या ६६ महिन्यांच्या थकबाकीवरून राज्य शासनाचे दुटप्पी धोरण!विशेष बातमी / प्रतिनिधी मुंबई: राज्य शासनाच्या विविध महामंडळांतील कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगानुसार प्रलंबित असलेल्या दिनांक 1 जानेवार...
-
नांदेड (विशेष प्रतिनिधी): महाराष्ट्र शासनाच्या ‘सेवा संकल्प अभियान’ व दिव्यांग सक्षमीकरण आयुक्तालय, पुणे यांच्या निर्देशानुसार, दिशा अभियाना...
-
नरेंद्र येरावार उमरी नांदेड कासराळी येथील स्वर्गीय मनोहर रुख्माजी लोकमनवार यांच्या मनोहरस्मृती या स्मृतिस्थळास माजी मंत्री तथा माजी खासदा...
RECENT WITH THUMBS$type=blogging$m=0$cate=0$sn=0$rm=0$c=4$va=0$hide=post
RECENT$type=list-tab$date=0$au=0$c=5$hide=post
REPLIES$type=list-tab$com=0$c=4$src=recent-comments$hide=post
RANDOM$type=list-tab$date=0$au=0$c=5$src=random-posts$hide=post
/gi-fire/ ONE WEEK POPULAR$type=one
-
महामंडळ कर्मचाऱ्यांच्या ७ व्या वेतन आयोगाच्या ६६ महिन्यांच्या थकबाकीवरून राज्य शासनाचे दुटप्पी धोरण!विशेष बातमी / प्रतिनिधी मुंबई: राज्य शासनाच्या विविध महामंडळांतील कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगानुसार प्रलंबित असलेल्या दिनांक 1 जानेवार...
-
नांदेड (विशेष प्रतिनिधी): महाराष्ट्र शासनाच्या ‘सेवा संकल्प अभियान’ व दिव्यांग सक्षमीकरण आयुक्तालय, पुणे यांच्या निर्देशानुसार, दिशा अभियाना...
-
नरेंद्र येरावार उमरी नांदेड कासराळी येथील स्वर्गीय मनोहर रुख्माजी लोकमनवार यांच्या मनोहरस्मृती या स्मृतिस्थळास माजी मंत्री तथा माजी खासदा...
-
नरेंद्र येरावार. कौठा नांदेड नांदेड जिल्ह्यात सहकार क्षेत्राचा विस्तार करून ग्रामीण भागातील शेतकरी, कष्टकरी, छोटे-मोठे व्यावसायिक, दूध उत्पा...
-
परभणी (क्रीडा प्रतिनिधी) दि. ७ नोंव्हें. गेल्या ३८ वर्षांपासून आपण क्रीडा क्षेत्राशी जोडल्या गेलो असून, माझ्या आयुष्यातील चढ-उताराचे हेच क्...

COMMENTS