धर्माबाद (अहमद लड्डा)
सिरजखोड येथील मिर्झा शहजादे खुर्रम बेग यांची टीपू सुल्तान ब्रिगेड या संघटनेच्या विद्यार्थी ब्रिगेड धर्माबाद तालुका अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. ही निवड टीपू सुलतान ब्रिगेडचे प्रदेश अध्यक्ष डाॅ. जहीरूद्दीन पठाण यांच्या मार्गदर्शनानुसार करण्यात आली आहे. त्यांना निवडीचे हे पत्र सिरजखोडचे माजी सरपंच मिर्झा गफ्फार बेग, मौलाना अंसार बेग आणि लक्ष्मण पवार यांच्या शुभहस्ते देण्यात आले.
टीपू सुल्तान ब्रिगेड ही देश सेवा आणि मानव सेवेसाठी समर्पित संघटना आहे. मागील दहा वर्षांपासून टीपू सुल्तान ब्रिगेड आणि दंगा मुक्त महाराष्ट्र अभियानाच्या माध्यमातून शेख सुभान अली हे महाराष्ट्रात शांती आणि न्यायाच्या स्थापनेसाठी निरंतर कार्य करत आहेत. स्वातंत्र्य, समता, बंधुत्व आणि न्याय सारख्या उच्च मानवीय मूल्यांवर आणि भारतीय राज्यघटनेवर आधारित एक आदर्श समाज आणि राष्ट्र घडविणे हे संघटनेचे अंतिम ध्येय आहे. तरी सर्व समाजातील सर्व शिक्षित, देशप्रेमी तरुणांनी टीपू सुल्तान ब्रिगेडच्या माध्यमातून देश सेवेसाठी आणि मानव सेवेसाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन प्रदेश अध्यक्ष डाॅ.जहीरूद्दीन पठाण यांनी केले.
याप्रसंगी जिल्हाध्यक्ष नवीद अहमद, जिल्हा उपाध्यक्ष फय्याज पठाण, टिपू सुलतान विद्यार्थी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष मोगल आवेज बेग उपस्थित होते.

COMMENTS