सेलू:- कै. श्रीरामजी भांगडीया यांच्या जयंतीनिमित्त दि. 2 जानेवारी रोजी कोरोना प्रादुर्भाव चे सर्व नियमांचे पालन करुन नूतन विद्यालय शिक्षण संस्था अंतर्गत शिक्षकांच्या बँडमिंटन क्रीडा स्पर्धाच्या उद्घाटनप्रसंगी, विनोद बोराडे म्हणाले की एक शिक्षक तयार झाला तर अनेक खेळाडू निर्माण करु शकतो. कोरोना प्रादुर्भाव पासून तंदुरुस्त व निरोगी राहण्यासाठी मैदानावर खेळणे गरजेचे आहे. या स्पर्धा स्तुत्य उपक्रम तून 26 जानेवारी ला संपूर्ण शहरातील शाळेतील शिक्षकांच्या बँडमिंटन क्रीडा स्पर्धा प्रकाश झोतात घेऊ असे प्रतिपादन केले.
उद्घाटनप्रसंगी कार्यक्रमच्या अध्यक्ष स्थानी प्रशालेचे मुख्याध्यापक अशोक वानरे, उद्घाटक नगराध्यक्ष विनोद बोराडे, प्रमुख उपस्थितीत उपनगराध्यक्ष प्रभाकर सुरवसे, उपमुख्याध्यापक रामकिशन मखमले,पर्यवेक्षक प्रा.नागेश कान्हेकर, प्राचार्य नरेंद्र पाटील ,गिरीष लोडाया आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रम चे प्रस्ताविक मुख्याध्यापक अशोक वानरे , तर सुत्रसंचालन काशीनाथ पल्लेवाड, आभार प्रदर्शन गणेश माळवे,यांनी मानले.
स्पर्धेत नूतन शिक्षण संस्थेतील पाच घटकतील 25 संघानी सहभाग नोंदवला,
अंतिम सामन्यात संस्थेचे सहसचिव डॉ. विनायकराव कोठेकर यांनी खेळाडूस शुभेच्छा दिल्या. यात प्रथम :- अतुल पाटील/ विशाल क्षिरसागर यांनी एक हजार रोख बक्षिस (प्रा.नागेश कान्हेकर यांच्या वतीने) तर व्दितीय बक्षिस:- निखिल झुटे/ किशोर ढोके ( यास सातशे रु रोख बक्षिस प्रा अशोक पाठक यांच्या वतीने) तर तृतीय बक्षीस :- सुनिल तोडकर/ व्यंकट तोरनाळे यास पाचशे रु रोख बक्षिस प्रा.महेश कुलकर्णी यांच्या वतीने देण्यात आले. सर्व विजेत्या दुहेरी संघास सन्मान चिन्ह इंद्रधनुष्य सेवाभावी संस्था वतीने देण्यात आले.
स्पर्धेस पंच म्हणून प्रा. महेश कुलकर्णी व सुरज शिंदे यांनी काम पाहिले.
स्पर्धा यशस्वी करण्यासाठी क्रीडा संयोजक गणेश माळवे, डी.डी.सोन्नेकर, सतिश नावाडे, विरेश कडगे, कुशल कडे, सचिदांन्नद डाखोरे, संतोष क्षिरसागर, संभाजी रोडगे, गजानन मुळी, महेश हजारे, प्रसाद कांयदे, केशव डाहाळे, मंचक घायाळ, अरुण रामपुरकर, यांनी परीश्रम घेतले.
![]() |
[: *फोटो ओळ :-कै. श्रीरामजी भांगडीया यांच्या जयंतीनिमित्त बँडमिंटन क्रीडा स्पर्धा उद्घाटन करताना सेलू नगराध्यक्ष् विनोद बोराडे, उपनगराध्यक्ष प्रभाकर सुरवसे, मुख्याध्यापक अशोक वानरे, प्राचार्य नरेंद्र पाटील, उपमुख्याध्यापक रामकिशन मखमले, पर्यवेक्षक प्रा.नागेश कान्हेकर, रघुनाथ सोन्नेकर, गिरीष लोडाया, क्रीडा स्पर्धा संयोजक गणेश माळवे, सतिश नावाडे, डी.डी.सोन्नेकर, काशीनाथ पल्लेवाड*



COMMENTS