केज _ प्रतिनिधी - तालुक्यातील मौजे साबला येथे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली . ...
केज _ प्रतिनिधी - तालुक्यातील मौजे साबला येथे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली .
या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदर्श शिक्षक नरहरी काकडे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून अशोक नाईकनवरे हे होते .
कार्यक्रमाच्या सुरुवातीस अध्यक्षांच्या हस्ते क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पुजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली . या कार्यक्रमासाठी उपस्थित पोपट काकडे , अनंत नाईकनवतरे , महादेव काकडे , भगिरथ काकडे ,राहुल मुळे , राजेभाऊ काकडे , सदाशिव काकडे , गणेश काकडे , गुलाब मुळे , महादेव कटारे इत्यादी मित्रमंडळी उपस्थित होते . तर या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन विशाल काकडे यांनी केले तर आभार अजय काकडे यांनी मानले .

COMMENTS