प्रतिनिधी/माजलगांव ------------------------- थोर समाजसुधारक स्त्रीशिक्षणाची जननी क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांनी महात्मा जोतिराव फुले य...
प्रतिनिधी/माजलगांव
-------------------------
थोर समाजसुधारक स्त्रीशिक्षणाची जननी क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांनी महात्मा जोतिराव फुले यांच्या प्रेरणेने स्त्रीशिक्षणाची मशाला देशात पेटविली महिलांना गुलामीच्या जोखडातून बाहेर काढत त्यांना समाजात आपले अधिकार व कतृत्व सिध्द करण्याचा अधिकार क्रांतीज्योती सावित्रीमाई यांनी शिक्षणाच्या माध्यमातून दिला.
" सुर्य ज्याप्रमाणे आपल्याला प्रकाश देतो व आपल्या जीवनातला अंधकार नष्ट करतो आगदी त्याचप्रमाणे महात्मा जोतिराव फुले सावित्रीमाई फुले यांनी शिक्षण देऊन ज्ञानाचे अमृत देऊन स्त्रीयांच्या जीवनामध्ये प्रकाश टाकला व त्यांच्या जिवनातला अंधकार नष्ट केला. स्त्रीयांना प्रत्येक क्षेत्रात आपले कौशल्य सिध्द करण्याचा अधिकार मिळुन दिला देशात नाव रोशन करण्याची संधी उपलब्ध करून
दिली. मनुवादी व्यवसथेने महिलांचे सर्व अधिकार हिराऊन घेतले होते महिलांना फक्त चुल मुल येईपर्यंत मर्यादित ठेवले होते. या गुलामीच्या जोखडातून बाहेर काढून महिलांना सर्व अधिकार, हक्क मिळुन देण्यासाठी महात्मा जोतिराव फुले व सावित्रीमाई फुले यांनी आपले आयुष्य महिलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी वेचले फुले दाम्पत्यांना हे महान कार्य करत असताना काही निर्बुध लोकाच्या त्रासाला सामोरे जावे लागले पंरतु महिलांना शिकवण्याचे कार्य त्यांने जोमाने सुरू ठेवले देशातील तळागाळातील सर्व सामान्य माणसाला शिक्षणाच्या प्रवाहात आनले व मानुस म्हणून त्यांनाही अधिकार आहे हे फुले दाम्पत्यांनी सिध्द करून दाखवले महिला आज देशाच्या प्रगतीमध्ये अग्रेसर आहे हे केवळ फुले दाम्पत्यांच्या महान कार्यामुळे सावित्रीमाई फुले यांनी केलेले महान कार्य हे देशाच्या प्रगतीसाठी प्रेरणादायी आहे त्यांच्या या महान कार्याबद्दल भारतरत्न हा पुरस्कार त्यांचा गौरव म्हणून जंयती निमित्ताने देण्यात यावा असे आव्हान तमाम फुले प्रेमीसह ओबीसी संघटक जिल्हाअध्यक्ष राम कटारे यांनी केले आहे.

COMMENTS