मुंबई दि १८:राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे माजी पदाधिकारी आणि निवृत्त कामगार शिक्षण विभाग प्रमूख रामचंद्र (राम)नायकुडे यांचे सोमवारी पहाटे अल्पशा आजाराने कराड येथे दुःखद निधन झाले.निधन समयी त्यांचे वय ८० वर्षे होते. रामचंद्र नायकुडे यांच्या पश्च्यात मुलगा, स्नुषा, नात,नातू असा कुटुंबपरिवार आहे.शिवडीच्या खाजगी गिरणीतील निवृत्त कामगार रामचंद्र नायकुडे यांचे संघटनेच्या अनेक लढ्यातील योगदान महत्त्वपूर्ण ठरले आहे.कामगार कायदे आणि कामगार चळवळीची इत्थंभूत माहिती असलेल्या नायकुडे यांच्या निधनाने एक अभ्यासू व्यक्तीमत्व काळाच्या पडद्याआड गेले,अशा भावपूर्ण शब्दात संघटनेचे अध्यक्ष माजीराज्यमंत्री सचिनभाऊ अहिर,सरचिटणीस गोविंदराव मोहिते यांनी नायकुडे यांच्या निधना बद्दल शोक व्यक्त केला आहे. संघाचे सर्व पदाधिकारी, ऑर्ग सेक्रेटरी, प्रतिनिधी, गिरणी कामगार व संघाचे सेवक वर्ग यांनी रामचंद्र नायकुडे यांच्या निधना बद्दल शोक व्यक्त केला आहे.★★
काशिनाथ माटल*

COMMENTS