बालाजी पाटील :
मुखेड तालुक्यातील अत्यंत प्रतिष्ठेच्या ठरलेल्या उंद्री(प.दे) ग्रामपंचायतीवर माधवराव पाटील यांचे वर्चस्व सिद्ध झाले आहे.९ पैकी ५ जागेवर विजयी झाले आहेत.मात्र माधवराव पाटलांच्या पत्नी ची खुर्ची पडल्याने कार्यकर्त्यात नाराजी आहे. गड आला पण सिंह गेला अशी स्थिती आहे.प्रतिस्पर्धी भास्कर पाटील सुर्यवंशी यांच्या गटाला ४ जागा जिंकता आली.याही वेळी प्रतिस्पर्धी गटाचा पराभव झाला आहे.मुखेड तालुक्यातील उंद्री(प.दे) ग्रामपंचायत निवडणुक याही वेळी अटीतटीची झाली.काँग्रेस विरुद्ध भाजप झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत काँग्रेसचा विजय झाला.ग्रामपंचायतीसाठी ९ जागेसाठी २० अर्ज दाखल करण्यात आले होते.ग्रामपंचायतीत वार्ड ३ असुन पहिल्या वार्डात पँनल प्रमुख माधवराव पाटील उंद्रीकर यांच्या पत्नी पार्वतीबाई माधवराव पाटील विरुद्ध प्रतिस्पर्धी सुर्यवंशी पार्वती भास्कर पाटील होते.माधवराव पाटील यांच्या पत्नीचा पराभव झाला आहे.पहिल्या वार्डात भास्कर पाटील सुर्यवंशी यांच्या ३ जागा, पार्वती भास्कर सुर्यवंशी,अडबलवार रोहीणी नागनाथ,पंदनवाड शंकरराव धोंडिबा तर दुसर्या वार्डात माधवराव पाटील यांचे राजु गंगाधर वाघमारे,वादे जयश्री जळबा व भास्कर पाटील यांच्या पँनलचे अडबलवार सुनिता रमेश तर तिसर्या वार्डात गन्लेवार वनिता रमेश,सोनकांबळे रमाबाई संदिप,नरवडे मिनाक्षी या उमेदवारांचा विजय झाला आहे.

COMMENTS