राम दातीर
माहूर (प्रतिनिधी )आपण सावित्रीबाईं फुले यांचे विचार आत्मसात करण्या ऐवजी त्यांचा जयजयकार करण्यातच धन्यता मानली.त्यांचा एकही गुण अंगीकारला नाही,प्रत्यक्षात त्या आमच्यात खऱ्या अर्थाने रुजल्याच नसल्याचे परखड मत कृतीका वरणगांवकर यांनी व्यक्त केले. माहूर येथील बुद्धभूमी परिसरात दि.3 जाने. रोजी थोर समाज सुधारक तथा आद्य शिक्षिका सावित्रीबाईं फुले यांची जयंती मोठया थाटात व उत्साहात साजरी करण्यात आली.त्यावेळी अध्यक्षीय समारोप करतांना त्या बोलत होत्या.
कुठलाही धार्मिक ग्रंथ अथवा पोथी किती वेळा वाचली, त्याला महत्व नाही, तर ती किती तन्मयतेने वाचली त्याला महत्व आहे. जो पर्यंत त्यांचे विचार अंगिकारणार नाही, अंमलात आणणार नाही तो पर्यंत समाजात बदल घडण्याची अपेक्षाच करता येत नसल्याची वास्तविकता वरणगांवकर यांनी मांडली.या प्रसंगी पद्दमा गिऱ्हे, कमलाताई पाटील, नगरसेवक रहेमत अली,प्रा.राजाराम गंदेवाड,भाजपा शहराध्यक्ष सागर महामुने, प्रा. राजेंद्र लोणे, एस.एस.पाटील, भवरे, राहूल भगत, रेणूकादास वानखेडे, श्रीरंग जगताप,राजकिरण देशमुख,सचिन बेहरे,जयंत गि-हे,सुनिता पाटील, नबूबाई वानखेडे, प्रज्ञा गायकवाड, शशिकला खडसे, हर्षदा कांबळे, सुनिता भगत, विजया मुळे, रमा कांबळे, मिना कांबळे यांचेसह मोठया संख्येत महिला भगिनी उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन व आभार प्रा.राजेंद्र कलाने यांनी केले.

COMMENTS