परंपरेला फाटा देत करणू कुडमते यांच्या पूण्यतिथी निमित्त विद्यार्थ्यांना केले शैक्षणिक साहित्याचे वाटप.


       राम दातीर 

माहूर( प्रतिनिधी ) आपल्या आई/वडीलांच्या पूण्य तिथी निमित्त मोठा गाजावाजा करून अन्नदान, वस्त्र दान, भजन, कीर्तन आदि बाबींवर वारेमाप खर्च करण्यावर जवळपास सर्वांचाच कल असतो. त्यातून मात्र कुठलेही समाजहीत साधल्या जात नसल्याचे वास्तव जाणून आ. भिमराव केराम यांचे स्वीय सहाय्यक प्रकाश कूडमते यांनी दि.5 जानेवारी रोजी आपले वडील करणू राजाराम कुडमते यांच्या पुण्य तिथीचे औचित्य साधून डोंगराळ व दुर्गम भागात वसलेल्या अंजनखेड येथील जि.प. शाळेतील ईयता पहीली ते चौथी पर्यंत शिक्षण घेणार्‍या 125 गोरगरीब विद्यार्थ्यांना वह्या,पेनसह अन्य शैक्षणिक साहित्याचे वाटप करून समाजा पुढे एक आदर्श निर्माण केला आहे. 

            आदिवासी समाजासह गोर गरीबांची संख्या अधिक असलेल्या माहूर तालुक्यातील नागरिकांचा मुख्य व्यवसाय शेती हाच आहे.मात्र निसर्गाच्या लहरीपणामुळे हा व्यवसाय नुकसानकारक ठरत आहे.त्यामुळे कुटुंबाचा उदरनिर्वाह भागवायचा की, मुलांना शिक्षण द्यायचे या विवंचनेत पालकवर्ग सापडला आहे.ती सत्यता जाणून प्रकाश कुडमते यांनी वाडगूरे, श्रीमती वाघमारे, आकाश नाईके, संदीप आडावे, दिगंबर वाघाडे, विलास भगत, भाजपा यूवा मोर्चा सरचिटणीस अशोक आखावे यांचेसह गावातील नागरीक व पालकांच्या उपस्थितीत गोरगरीब विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करून सामाजिक बांधिलकी जोपासल्याने सर्वस्तरातून प्रकाश कुडमते यांचे कौतुक होत आहे.

टिप्पण्या