जिल्हा प्रतिनिधी- महेंद्र पुरी, हिंगोली
हिंगोली जिल्हात काही गावगुंडा कडून मतदान कर्तव्यावर असणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्याला बेदम मारहाण केल्याची घटना वसमत तालुक्यातील गुंज येथे घडली असुन या प्रकरणी वसमत ग्रामीण पोलिस ठाण्यात सतरा आरोपी विरूद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र घटनेला दोन दिवस उलटूनही आरोपी अद्याप मोकाट फिरत आहेत..
हिंगोलीत कायद्याचा वचक राहिला का नाही? जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीत काही ठिकाणी पोलिसां सोबत बाचा बाचीचे प्रकार घडले आहेत. यामध्ये वसमत ग्रामीण पोलिस ठाण्याचे हद्दीत येणारे गुंज या गावातील जिल्हा परिषद शाळेतील मतदान केंद्रावर 15 जानेवारी रोजी मतदान प्रक्रीया सुरू असताना वसमत शहर पोलिस ठाण्यात नेमणुकीस असणारे पोलिस शिपाई गजानन पुरी हे आपले कर्तव्य पार पाडत असताना शंभर मिटर च्या आत येण्यास मज्जाव केल्याने आरोपीं शिवहार नरवाडे, दत्ता नरवाडे, काशीनाथ नरवाडे, मन्मथ नरवाडे, विश्वनाथ नरवाडे यांच्या सह दहा ते बारा जणांनी मिळून दहशत निर्माण करत, जिल्हाधिकारी यांच्या जमावबंदी आदेशाचे उल्लंघन करीत पोलिस कर्मचाऱ्याच्या काँलरला धरून खाली पाडुन लाथा बुक्यांनी मारहाण केली. तसेच दगडाने मारहाण करीत मतदान बूथ कँप्चर करण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी पोलिस शिपाई गजानन पुरी यांच्या तक्रारी वरून ग्रामीण पोलीस ठाण्यात आरोपी विरूद्ध कलम 353, 332, सह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र घटनेला दोन दिवस उलटूनही आरोपी अद्याप मोकाट फिरत आहेत. जिल्ह्यात कायद्याचा धाक राहिला का नाही? असे प्रकार घडत राहिल्यास कर्तव्य बजावणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्यांचे खच्चीकरण झाल्याशिवाय राहणार नाही. त्या आरोपींना तात्काळ गजाआड करावे अन्यथा हिंदू धर्म गुरू दशनाम गोस्वामी आखाडा संघटनेच्या वतीने संपुर्ण महाराष्ट्रात आंदोलन छेडण्यात येईल असा ईशारा संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष व्यंकटेश पुरी, मराठवाडा अध्यक्ष महेंद्र पुरी यांनी दिला आहे. दोन दिवसात आरोपींना अटक न झाल्यास संघटनेच्या वतीने नांदेड परिक्षत्राचे कर्तव्यदक्ष विशेष पोलिस उप महानिरीक्षक निसार तांबोळी यांची भेट घेऊन निवेदन सादर करण्यात येणार आहे.


COMMENTS