रविवार दि.17 रोजी माजलगाव येथे राममंदिर निर्माण अभियान तालुका कार्यालयाचे उद्घाटन ह.भ.प. हंसराज महाराज मिसाळ यांच्या शुभहस्ते व बीड जिल्हा पूर्व संघचालक प्रा.उत्तमजी कांदे अभियानाचे जिल्हा पालक अनंत तात्या देशपांडे, सुधाकरराव कुलकर्णी, जिल्हा कार्यवाह राकेश मोरे यांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात संपन्न झाले.
यावेळे बोलताना ह.भ. प. हंसराज महाराज मिसाळ म्हणाले की राम हे मर्यादा पुरुषोत्तम होते व ते सर्वमान्य असे देव आहेत. भक्तांबरोबरच भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा याला मान्यता दिलेली आहे. म्हणूनच भव्य असे मंदिर अयोध्या नगरीत तयार होत आहे. व त्यांनी सर्व नागरिकांना आवाहन केले की या निधी संकलन अभियानात सर्व हिंदू कुटुंबांनी आपले योगदान देऊन या ऐतिहासिक कार्यात सामील होऊन पुण्याचे काम करावे. यावेळी या अभियानाचे जिल्हा प्रमुख धोंडीराम शिंदे अभियानाचे जिल्हा सहप्रमुख डॉ.प्रशांत पाटील, जिल्हा अभियान स्वागत समिती सदस्य सौ.रुपालिताई कचरे, गोविंद बजाज, डॉ.सचिन डक, डॉ.किशोर भोपळे, प्रवीण शेजुळ यांची प्रमुख उपस्थिती होती..
या कार्यक्रमाची सुरुवात राम नाम जपाने झाली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तालुका अभियान सहप्रमुख बाबासाहेब आगे यांनी केले तर प्रास्ताविक परिचय अभियानाचे जिल्हा सहप्रमुख प्रा.अशोक होके यांनी केले व अभियानाच्या स्वागत समिती सदस्य सौ.रुपालिताई कचरे यांनी आपले मनोगत व्यक्त केले तर आभार प्रदर्शन तालुका अभियान प्रमुख जगदीश साखरे यांनी केले
या कार्यक्रमासाठी तालुका कार्यवाह प्रशांत भानप माजलगाव व्यापारी संघटना तालुका अध्यक्ष सुरेंद्र रेहदासनी, अमरनाथजी खुर्पे, बाळासाहेब देशपांडे, नगरसेवक पाणीपुरवठा सभापती विनायक रत्नपारखी, शरद कचरे, प्रा.गजानन होंना, प्रानेश पोरे सर, मधुर रूद्रवार, सोमेश दहिवाळ, संजय जवलेकर, अमर महाजन, प्रतिक जोशी, प्रथमेश बोबडे, अथर्व पोहणेरकर, स्वप्नील खुर्पे यांच्यासह अनेक रामभक्त उपस्थित होते.

COMMENTS