मनोज पाटील शिंदे, शिवराज पाटील शिंदे,पं.स.सभापती प्रभावती कत्ते यांनी केले नेतृत्व.
नायगांव प्रतिनिधी ( रामप्रसाद चन्नावार )
नायगाव तालुक्यातील मांजरम येथील ग्रामपंचायत निवडणूकीत माजी आमदार वसंतराव चव्हाण यांच्या समर्थकांनी सत्ता काबीज केली आहे . ग्राम जनविकास पॅनलने घवघवीत यश मिळवित १३ जागांवर दणदणीत विजय मिळवला.अन्य एक जागा बिनविरोध निवडण्यात आली.येथील निवडणूकीकडे संबंध तालुक्याचे लक्ष्य लागले होते.
नायगाव तालुक्यातील मांजरम येथील ग्रामपंचायत १५ सदस्यांची आहे. या निवडणूकीत एक जागा बिनविरोध निवडण्यात आली. उर्वरित १३ जागांवर ३४ उमेदवार निवडणूकीच्या रिंगणात उतरले होते. युवा नेते मनोज पाटील-शिंदे,माजी सरपंच शिवराज पा.शिंदे, पंचायत समितीच्या सभापती प्रभावती विठ्ठलराव कत्ते यांच्या नेतृत्वाखाली ग्राम जनविकास पॅनलने घवघवीत यश मिळवित १३ जागांवर दणदणीत विजय मिळवला.प्रभावी प्रचार यंत्रणा,मागील पंचवार्षिक काळात केलेली विकास कामे, जेष्ट व तरुणांचा सहभाग हे निवडणूक काळात प्रभावी मुद्दे ठरले.विजयी उमेदवार असे पदमाकर बळीराम पांचाळ,सोनाली राजेश शिंदे,मथुराबाई दिगाबंर शिंदे, बालाजी विठ्ठलराव मालीपाटील, रेखा राजेश विभूते, वर्षा संजय जाधव, रुक्मीणबाई रावसाहेब शिंदे,विजय माधव वाघमारे, शोभाबाई निळकंठराव मांजरमकर,शेषाबाई शंकर फुगारे,शिला विठ्ठल शेट्टेवाड, शेख गणी शेख करीम, खाकू व्यंकटी उल्लगुडवाड, तर ग्रामविकास परिवर्तन पँनलला एकाच जागेवर समाधान मानावे लागले. पँनलचे केवळ एक उमेदवार अंकिता उमेश केत्ते ह्या विजयी झाल्या.मांजरम ग्रामपंचायत मध्ये वीस वर्षीय तरुणी सुप्रिया भिमराव नव्हारे यांची बिनविरोध निवड झाली.या सर्व विजयी उमेदवारांचे अभिनंदन पॅनल प्रमुख मनोज पाटील शिंदे यांनी केले दुसऱ्यांदा ग्राम पंचायतीत दमदार इंट्री केली आहे.
रातोळी ग्रामपंचायतीच्या एकूण ११ जागापैकी सहा जागा बिनविरोध निवडण्यात आल्या होत्या. याठिकाणी उर्वरित पाच जागांवर निवडणूक झाली. यात विद्यमान आमदार राम पाटील-रातोळीकर यांच्या गटाचे पाचही उमेदवार विजयी झाले. आलूवडगाव येथे शिवाजी पवार यांच्या पॅनलला सहा जागा मिळाल्या तर जय अंबिका पॅनलला तीन जागेवर यश मिळाले. गडगा येथे डॉ. किशनराव पाटील यांचे जनसेवा पॅनलचे आठ उमेदवार विजयी झाले.तर माजी सरपंच रामराव कोरे यांच्या जनविकास परिवर्तन पॅनलचे ३ उमेदवार विजयी झाले तर नांवदीत उमाकांतराव देशपांडे यांनी सत्तेवर पुन्हा कब्जा केला आहे..

COMMENTS