नायगांव प्रतिनिधी ( रामप्रसाद चन्नावार )
कामरसपल्ली ता. बिलोली येथे माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर यांचे कट्टर समर्थक दिगंबर पाटील मालेगावे यांच्या पॅनलचा सात पैकी सहा जागा जिंकत प्रत्येक उमेदवाराचा मोठ्या मताधिक्याने दणदणीत विजय झाला आहे. तर काॅग्रेसचे माजी तालुकाउपाध्यक्ष गिरीधर पाटील डाकोरे हिप्परगेकर यांच्या समर्थकांचा धुव्वा उडाला आहे.
कामरसपल्ली येथील वार्ड क्रमांक एक मध्ये श्रीमती रेणूका पिराजी मालेगावे या प्रतिस्पर्धीच्या रुक्मिणबाई जाधव यांच्या पेक्षा ४१ मते अधिक घेऊन सर्वाधिक मतांनी विजयी झाल्या आहेत. ,विद्यमान सरपंच अनिल बापूराव जाधव यांचा मोठ्या फरकाने पराभव करत त्यांच्यापेक्षा ३१ मते अधिक घेऊन बालाजी गुणवंतराव माली पाटील विजयी झाले आहेत. गिण्यानबाई परशुराम श्रीरामे या सरूबाई पांचाळ यांच्या पेक्षा ३९ मते अधिक घेऊन विजयी झाल्या आहेत.
वार्ड क्रमांक दोन मध्ये मालेगावे गटाचे ओबिसी प्रवर्गातील रामराव सखाराम नाईक हे प्रतिस्पर्धी उमेदवार सरूबाई पांचाळ यांच्या पेक्षा ३२ मते घेऊन बहुमताने विजय झाले आहेत तर नंदाबाई रामराव जाधव यांचा अवघ्या दोन मताने पराभव झाला आहे. प्रतिस्पर्धी गटाच्या लक्ष्मीबाई हणमंतराव जाधव यांना ९० तर नंदाबाई जाधव यांना ८७ मते पडली आहेत.
वार्ड क्रमांक तीन मध्ये एस.सी. प्रवर्गातील मालेगावे गटाचे दोनच्या दोन उमेदवार निवडून आले आहेत. सुमनबाई शंकर सूर्यवंशी यांचा प्रतिस्पर्धी उमेदवार ह-याबाई सूर्यवंशी यांच्या पेक्षा २४ मते अधिक घेऊन विजयी झाल्या आहेत. माधव भीमराव कांबळे हे प्रतिस्पर्धी उमेदवार सोपान सूर्यवंशी यांच्या पेक्षा १५ मते अधिक घेऊन विजयी झाले आहेत.
आगामी जिल्हा परिषद च्या निवडणूका डोळ्यापुढे ठेवून काॅग्रेसचे गिरीधर पाटील डाकोरे हे रामतीर्थ सर्कल मध्ये अनेक गावात आपले समर्थक उभे केले होते. परंतु कामरसपल्ली येथे खतगावकर समर्थक वज्रमुठ आवळत हिप्परगेकर गटाला जोरदार चपराक लगावली आहे. तीन मताने विजयी होत केवळ एका जागेवर समाधान मानावे लागले आहे.
वियजी सदस्यांचे माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर यांनी स्वतः भ्रमणध्वनीवरून अभिनंदन केले आहे.
एक हाती विजय मिळवण्यासाठी माजी सरपंच दिगंबर पाटील मालेगावे, दादाराव जाधव, बालाजी नाईक, भारत मधुकर माली पाटील लक्ष्मण मालेगावे, माधवराव पाटील मालेगावे, बालाजी मालेगावे, एम.एस. सूर्यवंशी, मधुकर जहागिरदार, भानुदास सूर्यवंशी, देवानंद जाधव, संजय मालेगावे,माधव जाधव, रामराव कांबळे यांच्यासह अनेकांनी परिश्रम घेतले आहे.

COMMENTS