नायगांव( प्रतिनिधी)
नायगांव तालुक्यातील मौ.धनज येथे परमपूज्य भागवताचार्य निरंजनभाई जी महाराज यांची श्रीमद् भागवत कथा 1 जानेवारी रोज शुक्रवार पासून सुरू झाली आहे. दरम्यान आठ दिवस विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
धनज येथील श्री लोकडेश्वर महाराज मूर्ती स्थापना व कलशारोहनाच्या एकविसाव्या वर्धापन दिनानिमित्त अखंड हरिनाम सप्ताह, ज्ञानेश्वरी पारायण व श्रीमद भागवत कथा ज्ञान यज्ञ सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
प्रतिवर्षी प्रमाणे या ही वर्षी समस्त गावकऱ्यांच्या वतीने हा ज्ञानयज्ञ सोहळा साजरा करण्यात येतो. दिनांक 1 जानेवारी 2021रोज शुक्रवार पासून ते दिनांक 8 जानेवारी 2021रोज शुक्रवार पर्यंत सदरील ज्ञानयज्ञ सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. यात पहाटे चार ते सहा काकडा आरती, सकाळी सहा ते नऊ ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण, सकाळी दहा ते अकरा तुकाराम गाथा भजन, दुपारी एक ते चार परमपूज्य श्री निरंजनभाई जी महाराज यांचा श्रीमद् भागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळा, सायंकाळी पाच ते सहा हरिपाठ, रात्री नऊ ते अकरा हरिकीर्तन व जागर आदी धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
दररोज रात्री होणाऱ्या कीर्तन सोहळ्यात ह.भ.प. प्रभाकर महाराज मिस्त्री पिंपळगावकर, ह.भ.प. बाबू महाराज कुदळेकर, ह.भ.प. दत्ता महाराज, ह.भ. प. श्रीधर महाराज कासराळीकर, ह. भ. प. भगवान महाराज साळुंखे लातूरकर, ह.भ.प. सुरेश महाराज पांढरवाडी
कर,यांचे कीर्तन होणार असून दिनांक आठ जानेवारी रोज शुक्रवारी सकाळी नऊ ते अकरा वाजेपर्यंत ह. भ. प. निरंजनभाईजी महाराज (देवाची आळंदी) यांचे काल्याचे किर्तन कीर्तन होणार आहे.
सदरील धार्मिक कार्यक्रमाच्या आयोजनासाठी धनज येथील समस्त गावकरी मंडळी प्रयत्नशील आहेत.
दरम्यान आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात शासनाने घालून दिलेल्या नियमाचे पालन करण्यात येणार असून सर्वांनी साॅनिटायझर व मास्क चा वापर करावा असे आवाहन संयोजन समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

COMMENTS