सौ.सुषमा चंदनशिवे यांची रिपब्लिकन सेना महिला अघाडीच्या केज तालुका अध्यक्षपदी नियुक्ती.


 केज ,(प्रतिनिधी)

रिपब्लिकन सेनेचा झंझावात सद्या संपूर्ण महाराष्ट्रभर जोरात सुरु असुन गावागावात आता कार्यकर्त्याच्यां माध्यमातून शाखेचे जाळे विनले जात आहे. 

 रिपब्लिकन सेना या पक्षाचे सरसेनानी मा.आनंदराजजीआंबेडकर यांच्या आदेशानुसार व मा.सागर डबराशे( महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष)यांच्या मार्गदर्शनाखाली पक्षामध्ये महिलांचीही एक मजबूत फळी निर्माण व्हावी, महिलांनाही समाजात मानाचे स्थान मिळावे व महिला वरील अन्याय अत्याचार रोखण्यासाठी मदत होईल. या ऊद्देशाने जिल्ह्यासह सर्व तालुक्यातील व गावपातळीवर महिलांचे संघटन मजबुत करण्याचे ध्येय असल्याने नुकतेच केज तालुक्याची महिला आघाडी स्थापन करण्यात येत असुन नविन वर्षाचे औचित्य साधुन सामाजिक व राजकिय क्षेत्रात ओळख असणाऱ्या व महिलांच्या विविध प्रश्नांवर अंदोलनाच्या माध्यमातून आवाज ऊठवणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या सौ.सुषमा चंदनशिवे यांची दिनांक १ जानेवारी २०२१ रोजी केज तालुका महिला अघाडी च्या अध्यक्षपदी बीड जिल्हा अध्यक्ष प्रा.बळीरामजी सोनवणे सर यांच्या अध्यक्षतेखाली नियुक्ती करण्यात आली. व त्यांना नियुक्तीपत्र देवुन पुढील कार्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी पक्षाचे बिड जिल्हा अध्यक्ष प्रा.बळीरामजी सोनवणे सर, जिल्हा महासचिव सय्यद रज्जाक, आणि अरूण बनसोडे, तालुका अध्यक्ष गोपीनाथ ईनकर ,विश्वनाथ चोपणे ,अर्जुन चंदनशिवे, विश्वास चंदनशिवे व महिला कार्यकर्त्या मोठ्या संख्येने ऊपस्थित होत्या.

..

टिप्पण्या