नायगांव प्रतिनिधी
नव वर्षाच्या प्रारंभी पहिल्याच दिवशी अर्ध्या नायगांव शहरातील वीज पुरवठा तब्बल बारा तास बंद राहिल्याने गजानन नगर,श्रीनगर, संयोग नगर,सिधार्थ नगर,विठ्ठल नगर या भागातील विज पुरवठा दिवसभर बंद राहिल्याने या भागातील नागरिकांची पिण्याच्या पाण्यासाठी प्रचंड हाल झाले.
विज वितरण कंपनीच्या बे जवाबदार अभियंता मुळे नायगांव शहरातील विज पुरवठ्याचा खेळ खंडोबा झाला असून या भागात नियमीत सकाळ होताच पुरवठा गुल होतो.विजेचा हा लपंणडावास मागील अनेक महिन्या पासून चालत असतांना सहाय्यक व उप अभियंता या गंभीर बाबीकडे लक्ष देण्यास तयार नसल्याने नागरिकांत संताप व्यक्त केला जात आहे.
नायगांव शहराचा विज पुरवठा सुरळीत करण्यासाठी स्वतंत्र युनिट कार्यालय व सहाय्यक अभियंतायांची नियुक्ती करण्यात आलेली आहे.पण हे अभियंता आपली जवाबदारी योग्य प्रकारे पार पाडत नसल्याने शहराच्या विजपुरठ्याचा खेळ खंडोबा झाला.
नव वर्षाच्या पहिल्याच दिवसी निम्या शहराचा विज पुरवठा सकाळी सहा पासून बंद झाल्याने या भागातील नागरीक त्रस्त झाले आहेत. विज पुरवठा संध्याकाळी सातच्या दरम्यान सुरू झाल्याने दिवस भर विशेषता महिला वर्गाचे प्रचंड हाल झाले. तालुक्याचे ठिकाण असलेल्या शहराच्या ठिकाणची ही अवस्था असेल तर खेड्या पाड्यातील विज वितरण व्यवस्था बदल न बोललेले बरे.नायगांव शहर हे शिक्षणाची पंढरी म्हणून ओळखले जाते
शिक्षणासाठी राज्यभरातील विधार्थी या ठिकाणी शिक्षणासाठी येतात सत्तत विदयुत पुरवठा खंडित होत आसल्याने विद्यार्थ्यांचे मोठे नुसकान होत आहे.

COMMENTS