नायगांव प्रतिनिधी ( रामप्रसाद चन्नावार )
नायगाव तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणूक निकाल जाहीर होत आहेत .त्यात मुख्य पक्ष काँगेस व भाजपा पक्षाची निवडणून आलेल्या ग्रामपंचायत सत्ता आमची आली अशी स्पर्धा लागली असताना,रयत क्रांती संघटनेने या निवडणुकीत आपले खाते उघडले आहे. युवा तालुका अध्यक्ष साहेबराव चट्टे यांनी मुगाव ग्रामपंचायत सदस्य प्रतिनिधी म्हणून निवडून आले आहेत.
शेतकरी नेते व माजी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या मार्गदर्शनाखाली व युवा प्रदेशाध्यक्ष पांडुरंग शिंदे मांजरमकर यांच्या नेतृत्वाखाली नांदेड जिल्ह्यात रयत क्रांती संघटना काम करत आहे.
नायगाव युवा तालुका अध्यक्ष साहेबराव चट्टे यांच्या मातोश्री सौ.प्रयागबाई व्यंकटराव चट्टे ,
गंगाधर बालाजी कोकणे यांची पत्नी
सौ.संगिता गंगाधर कोकणे ,
संजय तुकाराम गंधकवाड ,अविनाश भालेराव यांच्या पत्नी सौ.प्रमेला अविनाश भालेराव हे चार सदस्य रयत क्रांती संघटनेचे निवडणून आले आहेत.निकाल जाहीर झालेल्या पैकी हे आहेत.
निवडणून आलेल्या सर्व सदस्यांचे पांडुरंग शिंदे यांनी अभिनंदन केले आहे.

COMMENTS