नायगाव प्रतिनिधी ( रामप्रसाद चन्नावार )
नायगांव तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुकीत धक्का दायक निकाल लागला असून राजकारणातील अनेक दिग्गज मंडळींना युवा वर्गाने धुळ चारली तर अनेक गावात सताधारी गटाला जबरदस्त हादरा देत विरोधकांनी या वेळी सत्ता ताब्यात घेतली आहे.विजयी उमेदवार व गट प्रमुखांचा माजी आ.वसंतराव चव्हाण यांच्या जनसंपर्क कार्यालयात सत्काराचे आयोजन करण्यात आले होते.
नादेड जिल्ह्याचे लक्ष लागुन असलेल्या महत्वपूर्ण आ.राजेश पवार यांच्या गटाचा त्यांच्याच अलुवडगावात दारून पराभव झाला.या ठिकाणी शिवाजी पवार यांच्या ९ पैकी सहा जागा आल्या तर आमदारार गट तिन जागा मिळवू शकला.
स्वच्छता दुत माधवराव पाटील शेळगावकर यांच्या गावात यांच्या शेळगाव गौरी गावात पंचायत समितीचे उपसभापती संजय पाटील शेळगावकर गटाला दारून पराभवाला समोर जावे लागले.या ठिकाणी प्राचार्य मनोहर तोटरे व शिवसेनेचे उप तालुका प्रमुख सुनिल रामदासी गटाने ९पैकी पाच जागा मिळवुन सत्ता ताब्यात घेतली.बहुचर्चित नरसी वर आपली सत्ता कायम ठेवण्यात भाजपा नेते श्रावण पाटील भिलवंडे यांना यश आले.सतरा पैकी तेरा जागेवर घवघवीत यश संपादन केले.जि.प.सदस्य माणिकराव लोहगावे गटाला दोन तर अपक्ष उमेदवार दोन जागेवर निवडून आले .काँग्रेस चे शे इसाक यांना खातेतेही उघडता आले नाही.
घुगंराळा येथील सत्ता कायम ठेवण्यात राष्ट्रवादीचे वसंत सुगावे याना सात जागा मिळवुन यश आले आहे.विरोधी गटाचे पंडीत सुगावे गटाला केवळ दोन जागा जिंकता आल्या.अंचोलीत खा.प्रताप पाटील चिखलीकर गटाचे प्रभाकर मोरे यांच्या पॅनलच्या सुपडासाफ झाला.माजी आ.वसंतराव चव्हाण गटाचे युवा नेते सुनिल मोरे गटाचे सर्वच्या सर्व सात उमेदवार निवडून आले आहेत.होटाळ्यात भाजपाचे सरचिटणीस शिवराज पाटील गटाने विरोधी गटाचा सहारा करत सर्वच जागा ताब्यात घेतल्या.
माजंरम या मोठ्या गावात शिवराज पाटील शिंदे व मनोज शिंदे गटाने बाजी मारत १४ जागेवर विजय मिळवला तर विरोधी विनायक शिंदे गटाला एका जागेवर समाधान मानावे लागले.
धुप्पा गावात गणपतराव पाटील व माधव कंधारे गटाने सर्वच जागा ताब्यात घेत भाजपाच्या अवकाश धुप्पेकर गटाचा पराभव केला.
टाकळीत मोहन पाटील टाकळीकर गटाला शह देत सचिन पाटील टाकळीकर यांनी सता संपादन केली.कांडाळा गावात चोरंगी लढतीत चांदु ईरेवाड गटाचे आठ तर बालाजी ईरेवाड गटाला केवळ एक जागा मिळाली.धानो-यात कंदकुर्ते गटाला सहा तर कुर्हाडे गटाला तिन जागा मिळाल्या.मुगाव गावात अशोक पाटील मुगावकर गटाला धक्का बसला नारायण गाडले गटाचे ९ तर मुगावकर गटाचे दोन उमेदवार निवडून आले.मुगावकर गटाच्या उमेदवाराच्या पत्तीचे मतदानाच्या दिवशी निधन झाले होते.खंडगावात सुरेश कदम यांच्या गटाने पाच जागा मिळवुन बाजी मारली विरोधी जोनकल्ले गटाला चार जागे मिळाल्या.
हिप्परगा येताजी कदम गटाने पुर्ण ९ जागा मिळवुन विरोधी बाजीराव कदम गटाचा धुव्वा उडविला.कुष्णूर परबतराव जाधव गटाने जि.प.सदस्य कमटेवाड गटाचा धुव्वा उडवत सात जागा ताब्यात घेत सत्ता ताब्यात घेतली.कमटेवाड गटाला केवळ चार जागा मिळाल्या.कोलंबी संजय बियाणे गटाचे सात तर उत्तम गवाले गटाचे चार सदस्य निवडून आले.कहाळा बु.सुनिल लुगांरे गटाने सात जागा मिळवुन सत्ता ताब्यात घेतली विरोधी वाहेद यांना दोन जागा जिंकता आल्या. सावरखेड हानंमतराव वानखेडे व सुधाकर वानखेडे गटाने नवू पैकी आठ जागा जिंकल्या तर बालाजी वानंखेडे गटाला एक जागा मिळाली.
मारामारीच्या घटनेने जिल्ह्यात गाजलेल्या रुई बु.गावात निलेश देशमुख गटाने बाजी मारत सात जागा पटकावत सत्ता ताब्यात घेतली.भुजगंराव शिंदे याना केवळ दोन जागा मिळाल्या.ईज्जतगाव हरी पाटील डोईफोडे गटाने सात जागा जिंकून सत्ता ताब्यात घेतली तर सजंय डोईफोडे यांना केवळ दोन जागा मिळाल्या. धनज आत्माराम जाधव गटाला सहा जागा मिळाल्या. विरोधी गटाला एकाच जागेवर समाधान मानावे लागले.दरेगाव संभाजी शिंदे गटाला पाच तर बाजीराव शिंदे गटाला दोन जागा मिळाल्या.


COMMENTS