*टेनिसव्हॉलीबॉल महाराष्ट्र असोसिएशनच्या राज्य कार्यकारिणीची व पदाधिकारी यांची सभे प्रंसगी टेनिसव्हॉलीबॉल खेळाचे जनक डॉ. व्यंकटेश वांगवाड, रा...
औरंगाबाद :- सर्वात कमी खेळाडू व कमी खर्चिक खेळ असणाऱ्या टेनिसहॉलीबॉल या देशी खेळाचा प्रचार-प्रसार करण्यासाठी राज्य व प्रत्येक जिल्हा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आपल्या जन्मदिनी परिसरातील प्राथमिक, माध्यमिक शाळा दत्तक घेऊन टेनिसव्हॉलिबॉल शहरी व ग्रामीण भागातील तळागाळात पोहोचवावा असे आवाहन महाराष्ट्र टेनिसव्हॉलिबॉल संघटनेचे अध्यक्ष सुरेशरेड्डी क्यामतवार यांनी केले आहे.
ते महाराष्ट्राचे टेनिस व्हॉलिबॉल असोसिएशनच्या वतीने यवतमाळ जिल्हा तालुक्यातील पाटणबोरी येथील रेड्डीज कॉन्व्हेंट स्कूल मध्ये 31 डिसेंबर रोजी आयोजित वार्षिक सर्वसाधारण सभेत अध्यक्ष म्हणून बोलत होते. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून टेनिस हॉलीबॉल खेळाचे जनक डॉ व्यंकटेश वांगवाड, राज्य टेनिस व्हॉलिबॉल संघटनेचे सरचिटणीस गणेश माळवे, खेळाडू समितीचे अध्यक्ष किशोर चौधरी, अमरावती विभागीय सचिव जयदीप सोनखासकर, शंकरराव गावंडे आदी उपस्थित होते.
विदर्भात व विशेषतः ग्रामीण भागात प्रथमच महाराष्ट्र राज्य टेनिस हॉलीबॉल संघटनेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेचे आयोजन करण्यात आले. या सभेत पुणे, बीड, जळगाव, लातूर, परभणी, अहमदनगर, चंद्रपूर, अमरावती, वर्धा, वाशीम, बुलढाणा, हिंगोली, अकोला, चंद्रपूर व यजमान यवतमाळ जिल्हा संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
या वार्षिक सभेत केंद्रीय क्रीडा धोरणानुसार राज्य संघटनेची कार्यकारिणी तयार करणे, खेळाच्या प्रचार-प्रसारासाठी प्रत्येक तालुक्यात टेनिस व्हॉलिबॉल असोसिएशनची स्थापना करणे, जिल्हा संघटनेचे प्रवेशशुल्क, 2021-22 वर्षातील नियोजित क्रीडा स्पर्धा आयोजन,पंच परीक्षा, कार्यशाळा आदी अनेक विषयांवर चर्चा करण्यात आली.
टेनिस हॉलीबॉल खेळाचे जनक डॉ व्यंकटेश वांगवाड यांनी संघटना कशी असावी व कशी चालवावी याबाबत मार्गदर्शन केले. अध्यक्ष सुरेश रेड्डी यांनी हॉलीबॉल खेळाच्या प्रसार- प्रचारासाठी आदिवासी आश्रमशाळा, शासकीय अनुदानित प्राथमिक, माध्यमिक शाळा व सीबीएससी शाळांमध्ये टेनिस व्हॉलिबॉल पोहोचवावा असे आवाहन केले.
वार्षिक सभेत सतीश नावाडे (परभणी), पुनम पेटकर( वर्धा) सागर गुल्हाने( वाशिम), निलेश भगत (यवतमाळ )यांनी आपले विचार व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक राज्य संघटनेचे सरचिटणीस गणेश माळवे यांनी केले. संचालक विभागीय सचिव जयदीप सोनखासकर तर आभार राज्य क्रीडा मार्गदर्शक किशोर चौधरी यांनी मानले. या सभेला हेमंत वाघ के.जे. शेख राजश्री गावंडे, देवेंद्र जोशी, अभय धोबे, संजय ठाकरे, शिवराज पाळणे, संतोष खोब्रागडे, सुनील कोपुलवार, अनिल तामगड़े, रोहित वनकर, अमोल

COMMENTS