जिल्हा प्रतिनिधी महेंद्र पुरी, हिंगोली
नांदेड परिक्षेत्राचे विशेष पोलिस उपमहानिरीक्षक निसार तांबोळी हे ४ जानेवारी रोजी हिंगोली दौर्यावर येणार असून तांबोळी हे कडक शिस्तीचे अधिकारी असल्याने त्यांच्या तपासणीची जिल्ह्यातील ठाणेदारांनी चांगलीच धास्ती घेतली आहे. गुन्हे निकाली काढण्यासाठी ठाणेदारांची धावपळ सुरू आहे.
सोमवारी नांदेड परिक्षत्राचे आयजी जिल्हयातील विविध पोलिस ठाण्याची वार्षिक तपासणी करणार आहेत. ज्यामधे वसमत ग्रामीण पोलिस ठाणे, औंढा नागनाथ पोलिस ठाणे, आखाडा बाळापुर, सेनगाव व गोरेगाव या ठाण्याची वार्षिक तपासणी करणार आहेत. तसेच उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालय वसमत, हिंगोली ग्रामीण कार्यालयाला भेट देउन पाहणी करणार आहेत अनुषंगाने जिला पोलिस अधिक्षक राकेश कलासागर यांनी जिल्हयातील सर्वच ठाणेदारांना पेंडींग गुन्हे निकाली काढण्याच्या सुचना दिल्या आहेत. तसेच आयजींच्या दौर्यानिमित्त पोलिस अधिक्षक कार्यालय, उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालया सह जिल्हयातील ठाण्याची रंगरंगोटी करण्यात येत आहे.
पोलिस अधिक्षक राकेश कलासागर यांच्या संकल्पनेतून अधिक्षक कार्यालयात भरोसा सेल स्थापन करण्यात आला आहे. ज्याची पाहणी आज जिला पोलिस अधिक्षक राकेश कलासागर, अतिरीक्त पोलिस अधिक्षक यशवंत काळे यांनी केली. सोमवारी नांदेड परिक्षेत्राचे पोलिस उपमहानिरीक्षक निसार तांबोळी हिंगोलीत आहेत. तसेच कुठल्याही पोलिस ठाण्याला अचानक भेट देवून कामकाजाची पाहणी करण्याची शक्यता आहे. यामुळे वार्षिक निरीक्षणाचे अनुषंगांने जिल्हयातील सर्व पोलिस ठाण्याची साफसफाई, रंगरगोटी, रेकॉर्ड अद्यावत करने, प्रलंबीत गुन्हयाचा निपटारा जलद गतीने सुरू आहे. वार्षिक तपासणी दौरान हिंगोली शहरातील नव्याने स्थापन करण्यात आलेल्या पेन्शनपुरा व रिसाला बाजार पोलिस चौकीचे उदघाटन आयजी तांबोळी यांच्या हस्ते होणार आहे. हिंगोली जिल्हयातील पिडीत महिला व बालकांना एकाच ठिकाणी सर्व प्रकारची मदत सुविधा उपबल्ध करून देण्या करीता एकाच छताखाली विविध सोयींची उपबल्धता करून पिडीत महिला व बालकांना मानसिक आधार देवून योग्य मार्गदर्शन करून त्यांचे पुर्नवसन करण्याकरीता पोलिस अधिक्षक राकेश कलासागर यांच्या संकल्पनेतुन भरोसा सेल ची स्थापना करण्यात आली आहे. महिलांना माहेरी आलो असून माहेरवासीयां सोबत आपन बोलत आहोत असे वातावरण निर्मिती भरोसा सेल मध्ये करने सुरू आहे. भरोसा सेल मधील अधिकारी कर्मचारी यांना त्या प्रमाणे प्रशिक्षण देण्यात आल्याची माहिती जिला पोलिस अधिक्षक राकेश कलासागर यांनी ग्लोबल मराठवाडाशी बोलतांना दिली आहे


COMMENTS